आज उषा खन्ना
ह्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा
मानाचा 'लता मंगेशकर'
पुरस्कार जाहीर झाला.
ही महाराष्ट्रा सारख्या
पुरोगामी राज्य साठी
खरच अभिमानाची गोष्ट
आहे. उषाजी जरी
हिंदी चित्रपट युगातील
संगीत क्षेत्रातील खूप
ख्यातनाम नाव नसले
तरी ते नक्कीच
सन्माननीय नाव आहे.
हिंदी चित्रपट विश्वात
महिला संगीतकार तसे
नवीन नाही. सरस्वतीदेवी
आणि जद्दनबाई ह्यांनी
आपला काळ गाजवला
आणि स्वतःचा दबदबा
पण निर्माण केला.
आनंदघन (म्हणजे आपल्या
लाडक्या लतादीदी) हे
नाव मराठी माणूस
विसरू शकत नाही.
तरी सुद्धा उषाजी
ह्यांचे कौतुक बऱ्याच
कारणांनी झाले पाहिजे.
सरस्वतीदेवी आणि जद्दनबाई
ह्यांचा दबदबा वेगळ्या
कारणांनी होता. तशी
पार्श्वभुमी उषाजींना नव्हती. त्यामुळे
साठच्या दशकात पुरुषांचा
दबदबा असणाऱ्या क्षेत्रात
स्वतःचे स्थान निर्माण
करणे हे अद्भुत
आहे. चित्रपट सृष्टीतील
कलाकारांचा संघर्षाचा इतिहास फार
प्रेरणादायक आहे. त्यात
महिलांचा तर फारच
कठीण असणार. जेव्हा
ओ. पी. नय्यरांनी
उषाजींचे नाव साशधर
मुखर्जींना सुचवले तेव्हा
त्यांनी पण अशीच कठीण परीक्षा
घेतली. उषाजींनी एक
वर्षभर दररोज दोन
गाणी संगीतबद्ध करायची.
उषाजींनी ते आव्हान
उचलले आणि दररोज
२ गाणी तयार
करू लागल्या. हा
क्रम काही महिने
चालला. शेवटी साशधरजींनी
खूष होऊन उषाजींना
'दिल देके देखो'
हा चित्रपट १९५९
मध्ये दिला. उषाजींनी
ह्या संधीचे सोने
केले. आजही ह्या
चित्रपटाची गाणी आपण
म्हणतो. लगेच आठवेल
असे 'दिल देके देखो' https://youtu.be/fOEyFKcWNec ‘दादा’
चित्रपटातील 'दिल के टुकडे
टुकडे
कर
के'
https://youtu.be/5BBBn9xV90Q ‘सौतन’ चित्रपटातील 'शायद मेरी शादी
का
खयाल'
https://youtu.be/xtrEjGdlfYc आणि 'ज़िन्दगी प्यार का
गीत
हे'
https://youtu.be/M9YGUkKphsg ‘साजन
बिना सुहागन’ चित्रपटातील 'मधुबन खुशबू देता
हें'
https://youtu.be/ZPT-rm0C0WE असे
अनेक गाणी आठवतात.
त्यांची गाणी साधी,
सहज आणि सोपी संगीतबद्ध
केलेली असायची म्हणुन
ती लोकप्रिय असायची.
उषाजींनी सर्वात जास्त
चित्रपट सावनकुमार बरोबर
केलीत. नंतर त्या
दोघांनी लग्न पण केले. त्यांच्या
वैयक्तिक जीवनात जाण्याचे
काही कारण नाही.
काही दिवसांनी ते वेगळे
पण झाले. तरी
सुद्धा सावनकुमारांनी त्यांच्या
सर्व चित्रपटाची गाणी
उषाजींना दिली. ह्यात
उषाजींच्या मनाचा दिलदारपणा
पण दिसतो.
उषाजींनी अनेक नवोदितांना
संधी दिली. येशुदास,
मोहम्मद अझीझ, हेमलता,
शब्बीरकुमार, सोनू निगम
असे नंतर प्रसिद्ध
झालेले गायक त्यांनीच
हिंदी चित्रपट प्रथम
आणले. माझ्या मते
हे त्यांचे फार
मोठे योगदान आहेच
पण हे ह्यांचे
मोठे मन पण दाखवते. आणि हे लक्षात घ्या
उषाजीं नंतर अजून
तरी उल्लेख करावे
अशी महिला संगीतकार
चित्रपट सृष्टीत आली
नाही. अश्या कलाकाराचा सरकारने योग्य
सत्कार करावा ही
नक्कीच आनंदाची गोष्ट
आहे. माझ्या तर्फे
उषाजीचे हार्दिक अभिनंदन!
सतीश गुंडावार
Date: 12-Sept-19
No comments:
Post a Comment