Friday, 27 December 2019

Bala


मुकद्दर का सिकंदर ह्या चित्रपटात 'मेरे अंगने तुम्हारा क्या काम है?' गाणे सर्वांनी ऐकले आहे. ह्यात व्यक्तीच्या बहुतेक व्यंगावर विनोद आहे. हे गाणे समाजाच्या मानसिकतेवर वार आहे. एखाद्याला चष्मा जरी लागला तरी तो आपल्या समाजात व्यंग आहे. माझा अंदाज आहे की 70% आपण भारतीय अश्याच कोणत्यातरी व्यंगा विरूद्ध लढत असतो, लपवत असतो. अशा सर्वांना बाला हा चित्रपट नक्कीच आवडेल.

माझ्या सारख्या कृष्ण वर्णीयाला आणि टक्कल पडलेल्या माणसाला तर तो नक्कीच आवडेल. अंशुमनच्या द्विधेत कुठेतरी आपलीपण द्विधा स्पष्ट दिसत होती. गोरे दिसण्यासाठी आणि डोक्यावरचे केस वाचवण्याचे बरेच प्रयत्न पण आठवलेत. पण वास्तविकता स्विकारायला किती वेळ लागला? होय वेळ तर लागला पण चित्रपट बघितल्यावर एक आनंद निश्चितच झाला की बऱ्याच प्रमाणात वास्तविकता स्विकारण्यात मला पण जास्त वेळ लागला नाही. वयानुसार केस पांढरे होणारच पण मी रंग लावत नाही ह्याचा पण आनंदा सह अभिमान पण झाला.

चित्रपटाच्या निर्देशकाचे जितके कौतुक करावे तितके कमीच. अश्या संवेदनशील विषयावर असा मनोरंजक सिनेमा करणे आणि 2 तास प्रेक्षकांना खुर्चीला शिळून ठेवणे हे कौतुकास्पद आहे.

सर्वांनी हा चित्रपट जरूर बघावा. स्वतःच्या व्यंगावर विनोद करायला आणि स्विकारायला मदत होईल. मुलांना घेऊन जावे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण काही प्रसंग प्रौढ लोकांसाठी आहे. चित्रपटाचा आवश्यक भाग आहे. पण मुलांनी काही प्रश्न विचारले तर उत्तर देणे कठीण जाईल.

मी 80% गुण देईन. भुमी पेडणेकरला एवढा मेकअप करण्यापेक्षा कृष्णवर्णीय अभिनेत्री घेतली असती तर जास्त वास्तविक वाटले असते. संगीत आजकाल बेताचेच असते त्यामुळे त्यावर भाष्य न केलेले बरे.

सर्वांनी आवर्जून बघावा असा चित्रपट. माझ्या मते आॅस्करला पाठवण्याजोगा. 

सतीश गुंडावार
17 नोव्हेंबर 2019

No comments:

Post a Comment