Friday, 27 December 2019

Saxophone अर्थात नागांग


मला भारतीय असण्याचा अभिमान असण्याचे एक कारण आहे की आपण कोणत्याही गोष्टीचे लगेच भारतीयकरण करतो. संगीत, कला, संस्कृती, खानपान किंवा पेहराव ह्यांचे भारतीयकरण झालेले आपण नेहमी बघतो. हे कदाचित आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट असेल. अश्याच एका भारतीयकरणाची एक गोष्ट आज सांगतो. अगदी लहानपनापासून मला एका वाद्यांचे आकर्षण राहिले ते म्हणजे Saxophone  अर्थात नागांग. त्याचा विशिष्ट आकार आणि त्यावरील आकर्षक बटना मुळे हे वाद्य आकर्षित करतेच पण त्याचा आवाज पण फार मोहक आहे.

हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळात असा संगीतकार सापडणे कठीण की ज्यांनी हे वाद्य वापरले नसेलपाश्चात्य देशात Rock आणि Jazz मध्ये मुख्यत्त्वे वापरले जाणारे हे वाद्य भारतीय संगीतकारांनी आणि वादकांनी सर्व प्रकारच्या रसात ह्या वाद्याचा वापर सर्जनशीलतापुर्वक केला. गाण्याचा रस कोणताही असो romantic, sad, club songs, किंवा rock and roll ह्या सर्व गाण्याचा mood ह्या वाद्याने रंगवला. ते मिनिटांच्या गाण्यात १० ते २० सेकंद वेळ ह्या वादकांना मिळाला असेल पण त्या वेळात पण ह्या कलाकारांनी त्यांची सर्जनशीलता दाखवली आहे. Saxophone चा वापर केलेल्या गाण्याची संख्या एवढी आहे की त्यातुन काही गाणे सांगणे म्हणजे समुद्रात मोती शोधण्यासारखे आहे.

Club मधील गाण्यात हे वाद्य पडद्यावर पण आले. LP चे 'मैं आया हुं लेके साज(https://youtu.be/RRzITO8hsw8). हिरोच्या हातातले वाद्य म्हणून Saxophone ने लवकरच नाव केले. ह्या गाण्यात prelude आणि interlude खूप Saxophone वापरले आहे. Saxophone आणि trumpet ची चांगली जुगलबंदी ह्या गाण्यात आहे. Muted trumpet चा अप्रतिम उपयोग ह्या गाण्यात ऐकायला मिळतो. पी नय्यर चे “हुजुरेवाला जो हो इजाजत” (https://youtu.be/-6ym4uOOtEo) हे गाणे तसे भारतीय थाटाचे पण Saxophone चा वापर prelude मध्ये अप्रतिम आहे. भारतीय थाटाचे गाणे club मध्ये असा विचार फक्त पी नय्यरच करू शकतात.  RD ने तर हे वाद्य फार वापरले आहे. 'तिसरी मंझिल' सर्वांनीच बघितला आहे. त्यातील ' हसिना झुल्फोवाली'  (https://youtu.be/uaTyirMKOBw ) मध्ये Saxophone ऐकण्यासारखा आहे. ह्या गाण्यात शम्मीकपूरच्या हातात Saxophone, Trumpet आणि Trombone हे तीनही brass वाद्य आहेत.  तसेच कारवा मधील 'पिया तू अब तो आजा' (https://youtu.be/dX-gSSLmxUU) मध्ये trumpet सोबत Saxophone आहे.

दर्दभरे गाण्यात किंवा विरह गाण्यात सुद्धा ह्या वाद्याने तो भाव जागृत करण्यात मदत केली. ही कमाल कदाचित भारतीय संगीतकारांचीच. सलिलदांचे 'जा रे उड जा पंछी' (https://youtu.be/YTMxRVtgLy4) , पी नय्यर चे 'हैं दुनिया उसीकी जमाना उसीका' (https://youtu.be/i85EpitOIkM). प्रत्येक interlude मध्ये Saxophone चा अप्रतिम वापर आहे. कल्याणजी आनंदजी चे 'तुम्हे याद होगा' (https://youtu.be/fvEIULDxSgI). हे गाणे तर Milestone गाणे आहे. ते पुढे सांगेन. शंकर जयकिशनचे 'बेदर्दी बालमा तुझको मेरा मन' (https://youtu.be/qixsOfJccUo) ह्या सर्व गाण्यांची उंची ह्या वाद्याने वाढवली.

Romantic गाण्यात तर हे वाद्य मुक्तपणे वापरले आहे. 'रुप तेरा मस्ताना' (आराधना) (https://youtu.be/HenA-OUyo0s), 'गाता रहे मेरा दिल' (गाईड) (https://youtu.be/7J1nr0-2O60), 'जा ने दो ना' (सागर) (https://youtu.be/6AWm00bSHiM), 'माना हो तुम बेहद हसीन' (https://youtu.be/Pu3c5WntSgo), 'मेरा प्यार भी तू हें’ (साथी) (https://youtu.be/iXprkd-pA_M),  ' ओ हंसिनी कहाँ उड़ चली' (https://youtu.be/R4Vj_XsfHTM). ह्या सर्व गाण्याच्या Romantic mood ला ह्या वाद्याची झालर आहे. तुम्हाला ह्या व्यतिरिक्त काही गाणी आठवत असेल तर मला जरूर सांगा.

हिंदी गाण्यात Saxophone ऐकले की आठवण येते ती मनोहरी सिंग ह्यांची. सचिनदेव बर्मन, सलिलदा आणि राहुलदेव बर्मन ह्यांच्या गाण्यात Saxophone ऐकले की समजायचे की ते मनोहरी सिंग ह्यांनी वाजविले असणार. मनोहरी सिंग हे नेपाळी वंशाचे वादक कलकत्ता मध्ये प्रसिद्ध होते. ते पुढे १९५८ मध्ये मुंबईला आले आणि हिंदी चित्रपट संगीतात हे प्रमुख वाद्य झालेमनोहरी सिंग ह्यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील Saxophone चे एक अनभिन्य सम्राट म्हणायला पाहिजे. 'तुम्हे याद होगा' ह्या गाण्यात १९५९ मध्ये solo saxophone त्यांनी वाजवला आणि ह्या वाद्याचा हिंदी गाण्यातला काळ सुरु झाला. स्वातंत्र्यापूर्वी अनिल बिस्वास ह्यांच्या वाद्यवृंदात रामसिंग म्हणून एक उत्कृष्ट Saxophone वादक होते. पण मधे मोठा काळ हे वाद्य मागे पडले ते मनोहरी सिंगनी अजुन पुढे आणले. त्यांना समकालीन राज सोढा, श्याम राज, आणि आपला मराठमोळा सुरेश यादव ह्या वादकांनी Saxophone अप्रतिम वापर हिंदी चित्रपटाच्या गाण्यात केला. अगदी आपल्या मराठी गाण्यात पण Saxophone खूप वापरला आहे. पं. हृदयनाथांनी संपेल ना कधी ही, हा खेळ सावल्यांचा’ (https://youtu.be/hQDPV8bVv9c) आणि श्रीनिवास खळेंनी ‘सावलीस का कळे’ (https://youtu.be/o3O-ip3IgZc) मध्ये अप्रतिम वापरले आहे.

हे वाद्य भारतात कसे आले ह्याचा इतिहास रोचक आहे. हे वाद्य अली बेन सौ एले ह्या फ्रेंच वादकाने भारतात आणले. हे वाद्य तसे आधुनिकच. ऍडॉल्फ सॅक्स (Adolphe Sax) नावाच्या बेल्जियन संगीतकाराने त्याची निर्मिती साधारण १८४० च्या सुमारास केली. म्हणून ह्याला Saxophone असे म्हणतात. अली बेन १८५१ ते १८५८ पर्यंत म्हैसूरच्या राजाच्या पाश्चिमात्य वाद्यवृंदाचा director होता. म्हणजे हे वाद्य निर्माण झाल्याच्या १० वर्षाच्या आत हे वाद्य भारतात आले. असे मानतात की अली बेनने काही भारतीय वादकांना हे वाद्य शिकवले. म्हैसूरच्या राजाच्या वाद्यवृंदात हे वाद्य तेव्हा पासून आहे.

ऍडॉल्फ सॅक्सने सर्वच म्हणजे ही प्रकारच्या Saxophone निर्मिती केली आणि पेटंट पण मिळवले. हीच प्रकार आजही थोड्या फार बदलाने जगात दिसतात. स्वतः ऍडॉल्फ सॅक्सने ह्या वाद्याचा बराच प्रसार केला. हे वाद्य लगेच लोकप्रिय झाले आणि युरोपात मिलिटरी बँड आणि Orchestra मध्ये वापरायला लागले. पण हे वाद्य १८९० सुमारास युरोपातून लुप्त झाले किंवा वापर कमी झाला. पुढे १९१० नंतर हे वाद्य अमेरिकन वादकांनी अजुन Jazz Band मध्ये वापरायला सुरुवात केली आणि ह्या वाद्याचा जगभर प्रसार सुरु झाला.

आपल्या भारतात प्रकारचे Saxophone प्रामुख्याने दिसतात. Soprano, Alto आणि Tenor. ह्या तीन प्रकारच्या वाद्याच्या आवाजात काय फरक आहे हे कळायला अजून माझे कान परिपक्व झाले नाही. Kenny G. हा प्रसिद्ध वादक Soprano वाजवतो. बऱ्याच Restaurant मध्ये संध्याकाळी मंद आवाजात Kenny G च्या Soprano Saxophone वरील धून तुम्ही ऐकल्या असतील.

दक्षिणेत ह्या वाद्याचा कर्नाटकी संगीतात आत्मसात करण्याचे प्रयत्न झाले. नुकतेच निधन पावलेले कादरी गोपालनाथ कर्नाटकी संगीतात Saxophone वाजवणारे प्रसिद्ध आहेत. त्यांनी कर्नाटकी संगीत saxophone वर जगभर नेले. त्यांना सुद्धा म्हैसूरच्या राजाच्या वाद्यवृंदातील एका वादकाने Saxophone शिकवले.

रा. स्व. संघाच्या घोषात शृंग दलाची सुरुवात पुण्यात साधारण १९५० च्या सुमारास झाली. Saxophone शृंग दलातील एक महत्वाचे वाद्य. आज शृंग दल भारतभर विस्तारले आहे. संरक्षण क्षेत्र सोडून नागरी क्षेत्रात प्रांगणीय संगीतात संघाजवळ सर्वात जास्त वादक असतील. कदाचित रा. स्व. संघाजवळ सर्वात जास्त Saxophone वादक असतील. एक घोष वादक म्हणून मला ह्या वाद्याचे नेहमीच कुतुहल राहले आहे.  

सतीश गुंडावार

२९-नोव्हेंबर २०१९

USHA KHANNA

आज उषा खन्ना ह्यांना महाराष्ट्र राज्य सरकारचा मानाचा 'लता मंगेशकर' पुरस्कार जाहीर झाला. ही महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्य साठी खरच अभिमानाची गोष्ट आहे. उषाजी जरी हिंदी चित्रपट युगातील संगीत क्षेत्रातील खूप ख्यातनाम नाव नसले तरी ते नक्कीच सन्माननीय नाव आहे. हिंदी चित्रपट विश्वात महिला संगीतकार तसे नवीन नाही. सरस्वतीदेवी आणि जद्दनबाई ह्यांनी आपला काळ गाजवला आणि स्वतःचा दबदबा पण निर्माण केला. आनंदघन (म्हणजे आपल्या लाडक्या लतादीदी) हे नाव मराठी माणूस विसरू शकत नाही. तरी सुद्धा उषाजी ह्यांचे कौतुक बऱ्याच कारणांनी झाले पाहिजे.
सरस्वतीदेवी आणि जद्दनबाई ह्यांचा दबदबा वेगळ्या कारणांनी होता. तशी पार्श्वभुमी उषाजींना नव्हती. त्यामुळे साठच्या दशकात पुरुषांचा दबदबा असणाऱ्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणे हे अद्भुत आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकारांचा संघर्षाचा इतिहास फार प्रेरणादायक आहे. त्यात महिलांचा तर फारच कठीण असणार. जेव्हा . पी. नय्यरांनी उषाजींचे नाव साशधर मुखर्जींना सुचवले तेव्हा त्यांनी पण अशीच कठीण परीक्षा घेतली. उषाजींनी एक वर्षभर दररोज दोन गाणी संगीतबद्ध करायची. उषाजींनी ते आव्हान उचलले आणि दररोज गाणी तयार करू लागल्या. हा क्रम काही महिने चालला. शेवटी साशधरजींनी खूष होऊन उषाजींना 'दिल देके देखो' हा चित्रपट १९५९ मध्ये दिला. उषाजींनी ह्या संधीचे सोने केले. आजही ह्या चित्रपटाची गाणी आपण म्हणतो. लगेच आठवेल असे 'दिल देके देखो' https://youtu.be/fOEyFKcWNec  दादा’ चित्रपटातील 'दिल के टुकडे टुकडे कर के' https://youtu.be/5BBBn9xV90Qसौतन’ चित्रपटातील 'शायद मेरी शादी का खयाल' https://youtu.be/xtrEjGdlfYc  आणि 'ज़िन्दगी प्यार का गीत हे' https://youtu.be/M9YGUkKphsgसाजन बिना सुहागन’ चित्रपटातील 'मधुबन खुशबू देता हें' https://youtu.be/ZPT-rm0C0WE  असे अनेक गाणी आठवतात. त्यांची गाणी साधी, सहज आणि सोपी संगीतबद्ध केलेली असायची म्हणुन ती लोकप्रिय असायची.
उषाजींनी सर्वात जास्त चित्रपट सावनकुमार बरोबर केलीत. नंतर त्या दोघांनी लग्न पण केले. त्यांच्या वैयक्तिक जीवनात जाण्याचे काही कारण नाही. काही दिवसांनी ते वेगळे पण झाले. तरी सुद्धा सावनकुमारांनी त्यांच्या सर्व चित्रपटाची गाणी उषाजींना दिली. ह्यात उषाजींच्या मनाचा दिलदारपणा पण दिसतो.
उषाजींनी अनेक नवोदितांना संधी दिली. येशुदास, मोहम्मद अझीझ, हेमलता, शब्बीरकुमार, सोनू निगम असे नंतर प्रसिद्ध झालेले गायक त्यांनीच हिंदी चित्रपट प्रथम आणले. माझ्या मते हे त्यांचे फार मोठे योगदान आहेच पण हे ह्यांचे मोठे मन पण दाखवते. आणि हे लक्षात घ्या उषाजीं नंतर अजून तरी उल्लेख करावे अशी महिला संगीतकार चित्रपट सृष्टीत आली नाही. अश्या कलाकाराचा सरकारने योग्य सत्कार करावा ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. माझ्या तर्फे उषाजीचे हार्दिक अभिनंदन!

सतीश गुंडावार
Date: 12-Sept-19

लतादिदी

आज २८ सप्टेंबर, लतादिदींना  ९१ व्या वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा!

मंगेशकर कुटुंबाने त्यात लतादिदीने त्यांच्या संगीत साधनेने ह्या विश्वावर अनंत उपकार केले आहेत. मराठी माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला दिदींच्या आवाजाने मंतरलेले आहे. त्यांनी केलेल्या कोणत्या योगदान बद्दल लिहावे हा मोठा प्रश्न आहे. त्यांची गाणी येणाऱ्या १०० पिढ्यातील गायकांना पाठ्यक्रम म्हणून पुरेलच पण सामान्य माणसाला आनंद, प्रेरणा, आणि सुख देत राहतील. महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आणि मानबिंदू असणारे ज्ञानेश्वर महाराज, शिवाजी महाराज, वीर सावरकर असो किंवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेश असो ह्यांची गाणी म्हटली की फक्त दिदी आठवतात. मराठी माणूस अजून किती दिवस पसायदान म्हणजेच "आता विश्वात्मके देवे"(https://youtu.be/DQTKecWB9OM) गातांना दिदींनी गायलेल्या चाली वर गातील? गणपतीची आरती म्हणायची असेल तर "सुखकर्ता दुखहर्ता" (https://youtu.be/w0W8Wh-8UCg)  आणि "गजानना श्री गणराया" (https://youtu.be/fV8WIzEHD-E)  दिदींच्या चाली वर गात लोकांच्या मनात किती वर्षे भक्ती उत्पन्न करेल? शिवाजी महाराजांवरचे गीत "हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा" (https://youtu.be/aAsIi5FXB14) हे किती वर्षे युवकांना देशासाठी काही करण्याची प्रेरणा देईल? देशभक्तीने भारलेल्या सळसळणाऱ्या रक्ताच्या तरुणाला वीर सावरकरांची गाणी "जयोस्तुते श्री महन्मंगले" (https://youtu.be/xQrElx8-idM) किंवा "ने मजसी ने परत मातृभूमीला" (https://youtu.be/I4pJ0aD5RtA) अजून किती वर्षे मातृभू वर प्रेम करण्याची ताकत देईल? एका मराठी शाळेतील शिक्षिकेला मुलांना विश्वाची प्रार्थना सांगायची असल्यास "गगन सदन तेजोमय" (https://youtu.be/UmA-PAbTejE) हे गाणे अजून किती वर्षे सांगेल? ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित कोणाजवळ ही नाही. येणारे ४०० वर्षे किंवा ५०० वर्षे किंवा जो पर्यंत इतिहास ज्ञानेश्वर महाराज, शिवाजी महाराज, आणि वीर सावरकरांना आठवेल तो पर्यंत मराठी माणूस दिदींचे गाणे विसरणार नाही, उपकार विसरणार नाही. वरील बहुतांशी गाणी दिदींनी त्यांच्या हिंदी चित्रपटातील कारकिर्दीत जेव्हा त्या उच्च पदावर असताना गायली आहे. हिंदी गाण्याचे मानधन हे मराठी गाण्याचे मानधनापेक्षा नक्कीच खुप जास्त असणार. मग आर्थिक व्यवहाराने फायदेमंद नसणारे ही मराठी गाणी दिदींनी का गायली असतील? त्या उच्च श्रेणीच्या गायिके बरोबरच ह्या मातीवर, ह्या मातीतील थोर व्यक्तीवर, हिच्या संस्कृतीवर, मराठी भाषेवर प्रचंड प्रेम, आदर आणि निष्ठा करणाऱ्या तर आहेच पण एक अभिजात कलाकृती करणाऱ्यांची दूरदृष्टी त्यांच्यात आहे. त्यांनी केलेली श्रीनिवास खळे सोबत केलेले "या चिमण्यांनो परत फिरा" (https://youtu.be/0qqy48B8-aIअसो किंवा हृदयनाथांची अनेक भावगीते असो हे त्यांची अभिजात कलाकृती करण्याची आंतरिक इच्छा दाखवते. प्रत्येक गाण्यात स्वतःची signature टाकण्याची तऱ्हा मनाला स्पर्श करणारी आहे.

हिंदी चित्रपटाचा त्यांचा आलेख तर कोणी तोडू शकत नाही. " मेरे वेतन के लोगो" (https://youtu.be/f7G9iQR5uyU) ने किती लोकांच्या डोळ्यातून किती वेळा अश्रु काढले असेल? नौशाद, रोशन, सचीन  देव बर्मन ह्याच्या बरोबर केलेली शास्त्रीय संगीतावरची गाणी जितकी गोड आहे तितकीच सलील चौधरी किंवा शंकर जयकिशन ने केलेल्या पाश्चिमात्य संगीतावर आधारलेल्या fusion तितकेच भारतीय गाणी वाटतात. मदनमोहन ह्यांनी त्यांच्या कडून किती गझल गावुन घेतल्या असतील ते फक्त दिदीच जाणे. राहुल देव बर्मन ह्यांची प्रेम गीते तर मला खूप सुखावणारी आहेत. ‘बेमिसाल’ मधील " री पवन, ढूँढे किसे तेरा मन चलते चलते" (https://youtu.be/Cu2zpXIBWKI) किंवापडोसन’ मधील 'भाई बत्तूर भाई बत्तूर’ (https://youtu.be/iRIXVQrS5s8किंवाघर’ मधील "आजकाल पाव जमीपर नही पडते मेरे" (https://youtu.be/MqCzyGLxQeQ) आणि अशी असंख्य गाणी आपण सर्वांना सुखी करतात.

माझ्या सारख्या मराठी माणसाला त्यांची मराठी आणि हिंदी गाणी ऐकून असा भाव निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण मला खात्री आहे की भारतातील अन्य भाषिकांचा  पण असाच भाव असेल. १९९९ -२००० मध्ये लतादिदींनी दीनानाथ रुग्णालयाच्या मदतीसाठी एक कार्यक्रम पुण्यात केला होता. लग्न झाल्यावर, पुण्यात स्वतःचे घर घेतल्यावर, वर्षाचा आमचा आदित्य असताना खिश्यात किती पैसे असतील? पण मी आदित्यला म्हटले की तुझ्या नातवांना तू  'मी लता दिदींचा Live show बघितला आहे' हे गर्वाने सांगता यावे म्हणून हजाराचे तिकीट काढून हा कार्यक्रम बघायला जाऊ असे सांगत तो कार्यक्रम बघायला गेलो. लतादिदीच्या युगात माझा जन्म झाला हे माझे भाग्यच.


सतीश गुंडावार
28-Sept-19