Friday 27 December 2019

चित्रगुप्त

हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक संगीतकारांनी खूप नाव कमावले. पण सर्वांच्या नशीबी किर्ती मिळाली असे नाही आणि हे प्रत्येक क्षेत्रात होते. पण ह्या व्यक्ती जेव्हा दूर जातात तेव्हा लोकांना त्यांची महती कळते. असेच एक संगीतकार म्हणजे चित्रगुप्तचित्रगुप्त म्हणजे 'कयामत से कयामत तक' ह्या चित्रपटाचे संगीतकार आनंद-मिलिंद ह्यांचे वडील. आत्ता तुम्हाला लगेच link लागेल. चित्रपट सृष्टीत सर्वांनाच परीश्रम करावे लागले. ते चित्रगुप्तांना पण करावे लागलेच. सुरवातीच्या काळात action films आणि low budget चित्रपटात काम केलीत पण नंतरच्या काळात मोठ्या बॅनर साठी पण काम केले. त्यांची प्रतिभा उच्च होती हे एका घटनेवरून कळू शकते. ६०-७० च्या दशकात मद्रास चे निर्माते हिंदी चित्रपट करायचे आणि उत्तम चित्रपट त्यावेळी ह्या मद्रासच्या निर्मात्यांनी केलीत. त्यापैकी एक म्हणजे AVM Production. हे जेव्हा सचिनदेव बर्मन कडे चित्रपटाच्या संगीताचे काम द्यायला गेलेत. त्याकाळी सचिनदा वर्षात फक्त चित्रपट करायचे आणि ते हा नियम काटेकोरपणे पाळायचे. सचिनदांनी आपली दिलगिरी व्यक्त केली पण त्यांना चित्रगुप्त कडे जायला सांगितले. सचिनदांची शिफारस म्हणून AVM ची लोक चित्रगुप्त कडे गेलीत. नंतर AVM आणि चित्रगुप्तने सुंदर चित्रपट तयार केलीत हा इतिहास आहे.

वैयक्तिकरीत्या मला चित्रगुप्त ह्यांच्या संगीतात नवीन किंवा वेगळेपण तसे काही दिसले नाही. ही माझी त्रुटी असेल. पण त्यांनी Double Bass ह्या वाद्यांचा वापर फारच उत्तम केला आहे. त्यांची गाणी ऐकतांना हे वाद्य जरूर अनुभवा. माझ्या मते त्यांनी त्या काळातील लोकप्रिय संगीताच्या वळणावर संगीत दिले. पण ह्याचा उलटा अर्थ काढू नयेत. स्वतंत्र शैलीत त्यांनी खूप अजरामर गाणी त्यांनी दिलीत. त्यातली बरीच चित्रपट लोक आज त्या सिनेमातील संगीतामुळे आठवतात. हे ह्यांच्या प्रतिभेचे द्योतक आहे. भाभी, में चूप रहुंगी, झबक, आकाशदीप सारखे त्यांचे चित्रपट वाखाळण्यासारखे आहेत. ह्या चित्रपटांची गाणी उत्कृष्ट आहेत. मला असे वाटते की मोहम्मद रफी कदाचित त्यांचे आवडते गायक असावेत. त्यांनी रफींकडून भरपूर गाणी गावुन घेतलीत. कदाचित रफींच्या उत्कृष्ट गाण्यामध्ये चित्रगुप्तची गाणी अधिक असतील. 'चल उड जा रे पंछी', 'इतनी नाजूक ना बनो', 'तेरी दुनियासे दूर चले होके मजबूर', 'चांद जाने कहा खो गया', 'लागी छुटे ना अब तो सनम', 'ये परबतो के दायरे', 'चली चली रे पतंग उड चली रे'. त्यांचे 'जाग दिल दिवाना रुत जागी', आणि  'मुझे दर्द दिल का पत्ता ना था' ही गाणी माझी आवडीची आहेत. रफींच्या चाहत्यांच्या यादीत ही गाणी नक्की असतील.

लतादिदीने सुद्धा चित्रगुप्त साठी फार सुंदर गाणी गायली आहेत. में चूप रहुंगी मधील 'तुम्ही हो माता पिता तुम्ही हो' हे गाणे आपल्या सर्वांचे आवडीचे आहे. तसेच त्याच चित्रपटातील 'कोई बता दिल हें जहाँ' अतिशय सुरेख गाणे आहे.  'कारे कारे बादरा', 'रंग दिल की धडकन', 'उठेगी तुम्हारी नजर धीरे धीरे', 'आजा रे मेरे प्यार के राही', 'छेडो ना मेरी झुल्फे',' दिल का दिया जलाके गया', आणि 'दगा दगा वै वै' हे तर सर्वांच्या आवडीचे आहे.

मुकेश आणि किशोरकुमारने नेमकीच गाणी गायली असतील. मुकेश ह्यांचे ''तेरी शोख नजर का दिवाना','एक रात में दो दो चांद खिले' आणि 'देखो मोसम क्या बहार हें' ही  गाणी अप्रतिम आहेत. तर किशोरकुमारची 'मचलती हुयी हवा में छम छम हमारे संग संग चले गंगा की लहरे' आणि 'अगर सुन ले तो इक नगमा' ही लोकप्रिय आहेत. शेवटी मन्ना डेंचे 'अलबेली नार प्रीतम द्वारे' हे शास्त्रीय संगीतावरील गाणे जरूर ऐका.

आज एवढेच एका गुणी संगीतकार बद्दल. तुमचे अभिप्राय जरूर लिहा. पुढे अश्याच गुणी कलाकारांबद्दल जरूर लिहीन.
 

सतीश गुंडावार
१६-नोव्हे-२०१९

3 comments: