Friday 27 December 2019

सलीलदा

बंगाली लोकांनी भारताच्या सांस्कृतिक जडणघडणे साठी मोलाचे काम केले आहे. साहित्य, कला, संगीत क्षेत्रात त्यांचे योगदान वादातीत आहेमागे मी एक लेख ऋषिदा वर लिहला. हा लेख असाच एका भद्र व्यक्तीवर म्हणजे सलीलदा म्हणजेच सलील चौधरी वर. १९४३ च्या बंगालच्या भीषण दुष्काळा नंतर सुरु झालेल्या आम लोकांच्या चळवळीतून आलेले हे एक रत्न. वडील चहाच्या मळ्यात नोकरी करायचे. तिथेच लहान सलीलदांना पाश्चात्य संगीताची ओळख आणि आवड निर्माण झाली. Choir, symphony, Rock, Jazz अश्या पाश्चिमात्य संगीत प्रकारात निपूण असलेले सलीलदा, भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचे गाढे अभ्यासक होते. ५० नंतरच्या दशकात भारतीय आणि पाश्चात्य संगीत ह्यांचा सुंदर मेळ घालून ज्याला Fusion म्हणतात हा संगीत प्रकार हिंदी चित्रपटात आणणारे अग्रेसर संगीतकार म्हणजे सलीलदा

प्रत्येक कला प्रकाराला एक व्यक्तिमत्व (body) असते. एखादी चित्र कोणी काढले असेल हे जाणकार लगेच ओळखतात त्या चित्राच्या व्यक्तिमत्वावरून. सचिन तेंडुलकरचा फटका त्याचा चेहरा दिसला नाही तरी आपण लगेच ओळखतो. तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत हे गाणे कोणत्या संगीतकाराने केले हे जाणकार लगेच ओळखतात ते त्या गाण्याच्या व्यक्तिमत्वावरून. पण सलीलदा त्याला अपवाद होते. त्यांची एक ठरावीक style नव्हतीच. त्यामुळे जेव्हा कधी हे गाणे कोणाचे असेल हे कळत नाही, गाणे खूप चांगले आहे, चांगले fusion पण आहे तर माझा पहिला कयास सलीलदा असतात. सलीलदा पाश्चात्य, भारतीय शास्त्रीय आणि लोकसंगीताचे जाणकार होते त्यामुळे त्यांनी ह्या सर्व प्रकाराचा भरपूर वापर त्यांच्या संगीतात केला. मला हिंदी चित्रपटातील fusion प्रकार खूप आवडतो म्हणुन मी त्यांच्या त्याच प्रकारच्या गाण्याबद्दल आज लिहणार आहे.

असे कमीच संगीतकार आहेत की जे असे काम करतात की त्यांची प्रत्येक कलाकृती उत्कृष्टच असली पाहिजे असा हट्ट असतो. सलीलदा त्यापैकी एक. सलीलदांचा संगीताचा प्रवास तसा १९५३ च्या फार प्रसिद्ध "दो बिघा जमीन" ने झाला. पण त्यांचा '५८ मधील "मधुमती" ह्या चित्रपटाने लोकांवर छाप पाडली. ह्यातील सर्वच गाणी अतिशय उत्कृष्ट आहेत. त्यातले "दिल तडफ तडफके कह रहा" ऎका. (https://youtu.be/o184v83-gkk) गाण्याची सुरवात सुंदर गिटारच्या तुकड्याने होते. अंतरा सुरु झाला की संपुर्ण भारतीय ठेका, तबला आणि interlude सुरु झाले की  अजून पाश्चात्य तुकडा अशी सुंदर गुंफण त्यांच्या बऱ्याच गाण्यात दिसेल. "परख" मधील "मेरे मन के दिये" ऐका. (https://youtu.be/tkVxXZVx7l8) गाणे फार प्रसिद्ध नाही पण fusion साठी जरूर ऐका. Choral arrangement अतिशय उत्कृष्ट आहे. सलीलदा स्वतःला मोझार्टचा पुनःर्जन्म समजायचे "छाया" मधील मोझार्टच्या symphony वर आधारित "इतना ना मुझसे तू प्यार बढ़ा" ऐका. (https://youtu.be/ClAXd0itpsA) अतिशय उत्कृष्ट fusion आहे. अंतरा मस्त भारतीय संगीत तर interlude उत्कृष्ट symphony. "आसू समझ के क्यु मुझे ऑख से तुमने गिरा दिया" ऐका (https://youtu.be/_w8KSpiLm14) भारतीय ठेका आणि पाश्चात्य संगीत ह्याची सुंदर गुंफण. सर्व interlude अप्रतिम आहेत. "माया" मध्ये सलीलदांनी अजरामर गाणी दिली आहेत. "ऐ दिल कहा तेरी मंझिल" (https://youtu.be/S199DH_hDfU) मध्ये तबल्या मागे symphony आणि interlude संपूर्ण Choral arrangement असा प्रयोग आहे. हा चित्रपट fusion गाण्यांचा खजिना आहे. "तस्वीर तेरी दिलमें जिस दिनसे उतारी हें" (https://youtu.be/cBgk0Ho0xkk) "जा रे जा रे उड जा रे पंछी" (https://youtu.be/YTMxRVtgLy4) मध्ये prelude पूर्ण पाश्चात्य बासरी तर अंतरा मध्ये तबला तर interlude मध्ये सुंदर नागांग (saxophone) असा स्वच्छंद सैराव सलीलदांनी केला आहे. "हाफ तिकीट" हा किशोरकुमारांचा चित्रपट त्यांच्या सारखाच नटखट. तसेच सलीलदांनी नटखट गाणी दिली आहेत. किशोरकुमारनी स्त्री आणि पुरुष आवाजातले गायलेले नटखट गाणे ह्याच चित्रपटातले. पण "वो इक निगाह क्या मिली" (https://youtu.be/ZYr2P9ei8PI) मध्ये लतादिदी पाश्चात्य पद्धतीने गायल्या आहेत ते ऐका. "आंखो में तुम दिल में तुम हो" (https://youtu.be/zAhFP43X5fE) पण ऐका. त्यांच्या "आनंद" चित्रपटाबद्दल काय लिहावे? सर्वच सुंदर गाणी "जिंदगी कैसी है पहेली हाये" (https://youtu.be/Psfm3s-Wmfo) मध्ये prelude मधील तुर्य (trumpet) दिल खुश करणारे आहे तर प्रत्येक interlude लक्ष देऊन ऐका master piece आहेत. "कही दूर जब दिन ढल जाये" (https://youtu.be/wjYK67cgNKc)  तितकेच fusion चे master piece आहे. रजनीगंधा मधील सर्वच गाणी fusion चा खजिना आहे. "कई बार यु ही देखा हें" (https://youtu.be/CPwbi-hfenI) मधील prelude मध्ये तुर्य (trumpet) ऐका वाह!! असाच एक सर्वांग सुंदर चित्रपट म्हणजे "छोटी सी बात" सर्वच सुंदर fusion गाणी. "न जाने क्यो होता हें जिंदगी के साथ" (https://youtu.be/F1t_Eeo-OQM) Prelude तुर्यने (trumpet) सुरु होते मग लगेच choir आणि नंतर छोटासा गोमुखचा (Euphoniums or baritone horn) तुकडा असे गजबचे combination ह्यात आहे. "ये दिन क्या आये लगे फुल हसणे" (https://youtu.be/nj9UuS-LjZw) मध्ये fusion मध्ये सतार कशी मस्त वापरली आहे. All time favorite "ओ जाने मन जाने मन तेरे दो नयन" (https://youtu.be/aAjMh5fT3TU) हे गाणे ह्याच चित्रपटातील.

ही सर्व गाणी आवर्जून ऐका आणि घरच्यांना पण ऐकवा. कोणत्या गाण्यात सारखेपणा दिसला किंवा काही pattern दिसला तर मला जरूर सांगा. असे सर्वांग सुंदर, स्वच्छ, मधुर, सर्वांचे मनोरंजन करणारे गाणी सलीलदांनी दिलीत. अशी गाणी आता दुर्मिळच. इतकी आधुनिक गाणी सलीलदांनी साठ आणि सत्तरच्या दशकात म्हणजे सुमारे ६० वर्षांपूर्वी दिलीत.

हा लेख लिहितांना मला त्यांची शुद्ध भारतीय आणि लोकसंगीतावरील उत्कृष्ट गाणी ह्यात लिहावी असा मोह होत होता. कसे तरी स्वतःला आवरले. पण मी तसे होऊ देणार नाही. ह्या गाण्यांवर लवकरच एक अजून लेख लिहणार आहे.

सतीश गुंडावार

१२-ऑक्टो-१९

No comments:

Post a Comment