Saturday, 17 July 2021

इलायाराजा

 


(टीप: ह्या ब्लॉग मधील गाण्यातील बेस गिटार फक्त headphone ऐकू येईल. मोबाईल फोनचा speaker किंवा earphone मध्ये अजिबात ऐकू येणार नाही.)

'मिठाचे माधुर्य' हा ब्लॉग लिहतांना बेस गिटार बद्दल खुप वाचले. हिंदी चित्रपट संगीतात harmony १९५० पासून दिसते. पण सुरुवातीच्या काळात चेलो (Chello) आणि डबल बेस (Double Bass) ह्यांचा वापर harmony म्हणून दिसतो. साधारण १९७५ च्या सुमारास बेस गिटारचा वापर हिंदी गाण्यात सुरु झाला. असे म्हणता की चरणजितसिंग ह्यांनी प्रथम हे वाद्य हिंदी चित्रपट संगीतात वापरायला सुरुवात केली. मागच्या ब्लॉग मी टोनी वाझ आणि RD वर केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. पंचमने हे वाद्य कसे अफलातून वापरले ते मागच्या ब्लॉग मध्ये लिहले आहे. तसे बेस गिटार सर्वच संगीतकारांनी वापरले पण मला बप्पी लाहिरी आणि इलायाराजा ह्यांनी केलेला वापर फारच नाविन्यपूर्ण वाटला. बप्पी लाहिरीकडे टोनी वाझ ह्यांनी वाजवले आहे. पण समीर रॉय ह्यांनी प्रामुख्याने वाजवले. समीर रॉय बद्दल विशेष माहिती मिळत नाही. इलायाराजा ह्यांच्या हिंदी गाण्यात प्रामुख्याने टोनी वाझ ह्यांनी वाजवले आहे. पण त्यांचा दक्षिणेतील वाद्यवृंदात बेस गिटार कोण वाजायचे ते माहित नाही. तसेही दक्षिणेतील संगीतसृष्टी माझ्यासाठी blackbox आहे.

इलायाराजा ह्यांचा पहिला हिंदी चित्रपट कदाचित सदमा असावा. त्यांचे कोणतेही गाणे काढले तर त्यात बेस गिटार आहेच. त्यांनी तो जवळपास सर्वच गाण्यात वापरले. त्यांचा आणि पंचम ह्यांच्या बेस गिटारच्या वापरात बराच फरक आहे. तो ऐकूनच समजू शकते. कॉलेज मधून बाहेर पडल्यानंतर त्यांचा पहिला चित्रपट बघितला तो म्हणजे शीवा. त्यातले 'आनंदो ब्रम्हा' (https://youtu.be/5SfrJKeV5p8) हे गाणे त्यावेळी खुपच आवडले होते. त्याप्रकारचे संगीत मी कदाचित पहिल्यांदाच ऐकत होतो. गाण्याचा intro बेस गिटारने सुरुवात होतो. संपूर्ण गाण्यात बेस गिटारच melody आणि harmony सांभाळत आहे

१९९०-९१ च्या सुमारास पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये भारतीय चित्रपट महोत्सव होता. आम्ही मित्र तिथे गेलोत. माझा एक मित्र म्हणाला की आपण 'अंजली' हा तमिळ चित्रपट बघितलाच पाहिजे. ऑफिस मधून लवकर निघून संध्याकाळी वाजताचा शो बघितला. तमिळ चित्रपट असल्याने बेताचीच गर्दी होती. तो चित्रपट बघून बाहेर आल्यावर डोकं सुन्न झाले. चित्रपट कळायला भाषा कळायची गरज नव्हती. त्या चित्रपटातील सर्वच गाणे उत्कृष्ट आहेत. कदाचित हा एकच चित्रपट असेल ज्यात कोरसचा वापर संपूर्ण गाण्यात केला आहे.  त्यातले एकच गाणे इथे देत आहे. ‘अंजली अंजली’ (https://youtu.be/kEBpHsVisT0). ह्या गाण्यात बेस गिटारचा वापर rhythm साठी वापरला आहे. पण माझी विनंती आहे की ह्या चित्रपटाची उर्वरित गाणी जरूर ऐका. ह्या चित्रपटाची चर्चा पुण्यात एवढी झाली की चित्रपट महोत्सव आयोजकांना अजून special show लावावे लागलेत. पुढे हा सिनेमा हिंदीमध्ये पण डब होऊन आला.

जो संगीतकार गेली ४५ (१९७६ पासून आज पर्यंत) वर्षे कार्यरत आहे आणि आजही तितकेच लोकप्रिय आहेत. असे इलायाराजा कदाचित एकटेच संगीतकार असतील. जवळपास १००० च्या वर चित्रपटांना संगीत दिले असले तरी फक्त १४ ते १५ हिंदी चित्रपटात त्यांचे संगीत आहे. कमल हसन ह्यांच्या 'हे राम' चित्रपटातील हे अगदी वेगळे गाणे. जन्मो की ज्वाला’ (https://youtu.be/N01fQ4I6UaA) गाण्यात पियानो आणि बेस गिटारची counter melody आहे. त्याच्या चिनी कम ह्या चित्रपटाची सर्वच गाणी उत्कृष्ट आहेत. अमिताभ बच्चन आणि तब्बू ह्यांचा सुंदर चित्रपट सर्वांनीच बघितला आहे. त्यातले Title Song चिनी कम’ (https://youtu.be/WGG8ObpHEow?t=15) ह्या गाण्यात very strong baseline आहे. 'जाने दो ना मुझे जाने दो ना' (https://youtu.be/88LD0Gn_Fjc) हे गाणे पण तसे title song सारखेच आहे. पण ह्यातली बेस गिटार, पियानो आणि लीड गिटारचे मिश्रण ऐकण्यासारखे आहे. अजून एक अमिताभ बच्चन चित्रपट म्हणजे पा. ह्या चित्रपटातील गुम सुम गुम’ (https://youtu.be/ElBkxw30YgQ) हे गाणे ऐकले की अंजली चित्रपटातील गाण्यांची आठवण येते पण बेस गिटार आणि लीड गिटारचे मिश्रण सुंदर आहे. ह्याच चित्रपटातील उडी उडी इत्तेफाक से’ (https://youtu.be/ABN0t4cukLk) ह्या गाण्यात बेस गिटार चा वापर rhythm आणि harmony साठी सुंदर केला आहे. अमिताभ बच्चनचा विषय निघालाच तर त्यांनी शमिताभ ह्या चित्रपटातील गायलेले 'पिडली सी बाते' (https://youtu.be/bH4BwIlcnK0) कदाचित त्यांनी गायलेल्या गाण्यातील सर्वात सुंदर गाणे असावे. तसेच ‘बंदर की डुगडुगी’ (https://youtu.be/5mVlrIsbCVI) हे मुंबई Express ह्या चित्रपटातील हे गाणे म्हणजे pure bass guitar special म्हणावे लागेल. 

इलायाराजा ह्यांनी गायक नसलेले लोकांकडून पण गावुन घेतले. अमिताभ बच्चन आणि कमल हसन ह्यांची गाणी ऐकली असतील पण पंकज कपूर कडून जागते राहो ह्या सलील चौधरी ह्यांनी संगीत दिलेल्या 'जिंदगी ख्वाब हे' हे गाणे नवीन पद्धतीने (https://youtu.be/2ZU684l2sCs?t=19) गावुन घेतले. ह्या गाण्यातील बेस गिटार ऐकण्यासारखा आहे.

त्यांनी संगीत दिलेल्या सदमा ह्या चित्रपटावर जर लिहले नाही तर ब्लॉग पूर्ण होणार नाही. त्या चित्रपटातील अंगाई सुरमई अखियोंमे’ (https://youtu.be/XvJX9BqoU0U) आजही घरोघरी आई आपल्या बाळांना झोपवण्यासाठी गाते. सुरेश वाडकर ह्यांनी गायलेले हे जिंदगी गले लगा ले’ (https://youtu.be/8A30PWazxMU) पण सहज गाता येईल असे आहे. ह्या चित्रपटात टोनी वाझ ह्यांनी बेस गिटार वाजवले असे ऐकले. ह्या चित्रपटातील इतर गाण्यात पण सुंदर बेस गिटारचा वापर आहे. ती गाणी पण जरून ऐका.

इतका गुणी संगीतकार असून त्यांची हिंदी गाणी रसिकांच्या ओठावर सहसा असत नाही. कदाचित त्यांचे संगीत थोडे symphony थाटाचे असते. जे सहज गुणगुणता येत नाही. गाण्यातील prelude आणि interlude सुद्धा सहज गुणगुणता येत नाही. हे सुद्धा कारण असेल. असे असले तरी चोखंदळ रसिकांनी त्यांना नेहमीच दाद दिली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या वयात पण ते तेवढ्याच उत्साहाने संगीत देत आहे. त्यांना दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा!

सतीश गुंडावार

१७-जुलै-२०२१

7 comments:

  1. सतीश जी खुप छान लिहिले आहे

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणे छान अभ्यासपूर्ण लिहिलंस.

    ReplyDelete
  3. खुप अभ्यासपूर्ण लेख.छान लिहिले आहे

    ReplyDelete
  4. खूपच सूक्ष्म निरीक्षण आहे तुझे...आणि ते सोप्या शब्दात, सटीक असे लिहितोस तू सतीश !!

    ReplyDelete
  5. Khup sundar keep writing dear as always well studied well said...

    ReplyDelete