Sunday 30 May 2021

मिठाचे माधुर्य

जेवणात मीठ चांगले झाले तर त्याची कोणी स्तुती करत नाही पण भाजीत जर मीठ नसेल तर जेवण सोडून आधी आपण मीठ घेतो. तसेच शरीरात बऱ्याच ग्रंथी असतात त्या निमुटपणे काम करत असतात. जोपर्यंत त्या निमुटपणे काम करतात तोपर्यंत आपले लक्ष त्याकडे जात नाही. पण एखादी ग्रंथी बरोबर काम करत नाही तेव्हा ती आपल्याला आठवतेहिंदी चित्रपट संगीतात पण असेच काही आहे. एखादी गाणे खूप आवडते पण ते का आवडते हे सांगणे कधी कधी जरा कठीणच जाते. एखाद्या गाण्याच्या चारीही बाजू म्हणजे गायकी, ताल, melody आणि harmony चांगल्या जुळुन आल्या की ते गाणे आवडते. पहिल्या तीन गोष्टी लगेच लक्षात येतात पण harmony कडे सहसा लक्ष जात नाही. मागे एका ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे harmony मिठासारखे काम करते. लगेच लक्षात येत नाही पण harmony जर गाण्यात नसली तर गाणे मिळमिळीत वाटते. जुन्या हिंदी चित्रपट संगीतात double bass हे वाद्य harmony चे काम करायचे. साधारण १९७० नंतर हेच काम बेस गिटार करायला लागले.


(टिप: ह्या ब्लॉग मधील गाणी Headphone लावून ऐका अगदी Earphone पण नाही. मोबाईलच्या स्पीकरवर तर नाहीच नाही. त्यावर बेस गिटार ऐकूच येणार नाही. ह्या ब्लॉग पुरते फक्त बेस गिटार कडे लक्ष द्या.)

बेस गिटारचा सर्वोत्तम उपयोग जर कोणी केला असेल तर ते म्हणजे राहुल देव बर्मन! त्यांनी केलेले प्रयोग आजही सुरु आहेत. बेस गिटारचा मूळ उपयोग harmony साठी आहे. पाश्चात्य संगीतात ड्रम बरोबर rhythm साठी नेहमीच बेस गिटार दिसते. पण RD आपल्या लौकिकानुसार बेस गिटारचा वापर melody, counter melody आणि rhythm साठी पण केला आहे. एका गाण्यात चक्क मुख्य वाद्य म्हणून पण वापरले. गाण्याचा intro म्हणून बेस गिटारचा वापर कदाचित RD सर्वात पहिले केला असावा. तू तू है वही’ (https://youtu.be/9cDN-s8mLvU) आणि जाने जा मेरी जाने जा’ (https://youtu.be/ZlzJNXo_hTo) ह्या दोन्ही गाण्याची सुरवात बेस गिटारने केली आहे. पाश्चात्य संगीतात ड्रम बरोबर बेस गिटार नेहमीच वाजते मग ती तबल्यासोबत का वाजू नये असा विचार जर RD ला आला नसता तर आश्चर्यच! ‘सागर’ चित्रपटातील हे गाणे त्याचे उत्तम उदाहरण. ‘जाने दो ना’ (https://www.youtube.com/watch?v=zl4_zVp_mo0) video link दिल्यामुळे काही जण हिरमुसले असतील! पण त्यावेळी तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे original soundtrack आणि चित्रपटातील soundtrack वेगळा ऐकू यायचा. त्यामुळे ह्या ब्लॉग मध्ये original soundtrack द्यायचा प्रयत्न केला आहे. हिंदी चित्रपटात Digital Sound आल्यावर ही कमतरता दिसत नाही. तबला आणि बेस गिटारचे अजून काही गाणी RD ने केलीत. ‘इजाजत’ मधील 'मेरा कुछ सामान' (https://youtu.be/6i9YxZKnQeY), ‘मासूम’ मधील 'दो नयना और एक कहानी' (https://youtu.be/x4whSn_b7Vs) ह्यात रेसो रेसो पण rhythm ला आहे. अजून असेच सुंदर गाणे रोज रोज आंखो तले’ (https://youtu.be/ypn9vN1F4yo) ज्यात तबला, बेस गिटार आणि रेसो रेसो आहे

RD ने मासूम, सत्ते पे सत्ता, इजाजत आणि अश्या बऱ्याच चित्रपटात बेस गिटारचा prominently वापर केला आहे. माझ्या मते harmony साठी बेस गिटारचा सर्वोत्तम उपयोग 'रॉकी' चित्रपटातील 'क्या यही प्यार है' (https://youtu.be/9z6EEprP4rA) हे गाणे आहे. ह्या गाण्याचा video YouTube वर आहे. तुम्हाला दोघातील फरक लक्षात येईल. ह्या प्रकारचे अजून एक सुंदर गाणे म्हणजे 'जाने जा धुंडता फिर रहा' (https://youtu.be/ocb-UQtl854). ‘इजाजत’ चित्रपटातील कोणते गाणे घ्यावे असा प्रश्न पडतो म्हणून दोन गाणी देत आहेछोटी सी कहानीसे’ (https://youtu.be/3wmmqnoW_us) हे गाणे आशाताईच्या आवाजाचे overlap साठी पण ऐकले पाहिजे आणि कतरा कतरा जिंदगी’ (https://youtu.be/nhQUHvZSlvs) ही गाणी बेस गिटारचे उत्तम उदाहरण आहेत. ‘सत्ते पे सत्ता’ ह्या चित्रपटातील 'दिलबर मेरे' (https://youtu.be/uFaaqPv6dn4), ‘मासूम’ चित्रपटातील 'तुझसे नाराज नहीं जिन्दगी' (https://youtu.be/GQLnC6ds44k), ‘शान’ चित्रपटातील 'प्यार करने वाले' (https://youtu.be/B3vNAkalzhw) ह्या गाण्यात बेस गिटार नाविन्यपूर्ण आहे. बेस गिटारची एकच phrase वेगवेगळ्या पट्टीत वाजवले आहे. RD ने बेस गिटार solo instrument सारखा वापर एका गाण्यात केला. ‘लिबाज’ चित्रपटातील 'सिली हवा छू गयी' (https://youtu.be/CUz3spIxT7s) कान देऊन ऐका.

वाचकांना वाटत असेल की ह्या वाद्याबद्दल विशेष करून का लिहायचे. कितीही मोठा Orchestra असला तरी त्यात ड्रम, पियानो, बेस गिटार, अकोर्डीअन, सॅक्सोफोन ही वाद्य एकच असतात. ह्या वाद्यात एकटे गाणे पेलण्याची ताकत आहे म्हणून मला ही वाद्य आवडतात. पण RD कडे बेस गिटार कोण वाजवायचे? मागच्या ब्लॉग मध्ये मी त्यांच्या बद्दल लिहले आहे. RD ची ही वरची सर्व गाणी Tony Vaz नावाच्या वादकाने वाजवली आहे. हा ब्लॉग RD, बेस गिटार आणि Tony Vaz ह्यांवर केंद्रित लिहायचा होता. Tony Vaz ह्यांनी अनेक संगीतकारासोबत पण काम केले आहे. म्हणून इलया राजा सोबत केलेला 'सदमा' हा चित्रपट आवर्जून घ्यावा वाटतो. ह्यातली सर्वच गाणी उत्तम आहेत. त्यातले एक गाणे म्हणजे 'ए जिंदगी गले लगा ले' (https://youtu.be/8A30PWazxMU) ह्या गाण्यात Tony Vaz ह्यांनी RD सारखी बेस गिटार वाजवली नाही.

RD ची बेस गिटारची template नंतर बऱ्याच संगीतकारांनी वापरली. पण बप्पी लहरी, ए. आर. रहमान, विशाल भारद्वाज, विशाल-शेखर, जतीन-ललित, शंकर महादेवन ह्यांनी पण बेस गिटार फार नावीन्यपूर्ण वापरले आहे. नवीन बेस गिटार solo वादकात मोहिनी डे ह्या तरुणीचे नाव सन्मानाने घ्यावे लागेल. ब्लॉगची लांबी मर्यादित ठेवण्यासाठी ह्यांची सुंदर गाणी इथे देऊ शकत नाही पण हा ब्लॉग वाचल्यानंतर बेस गिटार कडे कान गेलेत तर हा ब्लॉग सफल झाला असे मी समजले.

तरी पण शंकर महादेवनची दोन गाणे द्यायचा मोह आवरत नाही. 'बगिया बगिया बालक भागे' (https://youtu.be/5OFhD138-Eg) ह्या गाण्याचा intro बेस गिटारचा आहे. संपूर्ण गाणे शास्त्रीय संगीताच्या अंगाचे असले तरी त्याने बेस गिटार उत्तम वापरले आहे. ‘ये जिंदगी ना मिलेगी दुबारा’ चित्रपटातील 'सेनोरिटा' (https://youtu.be/2Z0Put0teCM) हे गाणे सर्वांच्या आवडीचे आहेच.

असे बेस गिटारचे मिठासारखे काम आहे पण त्यातले माधुर्य तुम्हाला नक्कीच आवडले असेल.

सतीश गुंडावार

३०-मे-२०२१

3 comments:

  1. खूप छान, अत्यंत अभ्यासपूर्ण..

    ReplyDelete
  2. नेहमी प्रमाणे खूप नवीन माहिती

    ReplyDelete