Sunday 2 May 2021

पानात न बसणारी माणसे

जसे मागे मी सांगितले की World Music हा शब्द तयार व्हायच्या आधीच World Music किंवा Fusion Music हिंदी चित्रपटात स्थिर झाले होते. आपल्या संगीतकारांनी पाश्चात्य संगीताने प्रेरित होऊन बरीच गाणे केलीत. काल बिटलचे एक भारतीय संगीतावर आधारित इंग्रजी गाणे सांगितले. जान पेहचान लो’ हे हिंदी गाणारी बरीच पाश्चात्य लोकांबद्दल आधीच लिहले आहे. असेच आज मूळ हिंदी गाणे पण त्याचे संगीत जसेच्या तसे वापरून इंग्रजी गाणे तयार केलेली दोन उदाहरण देत आहे. Ivy York ह्या ऑस्ट्रेलियन गायिकेने “The Call of Spring” ह्या album मध्ये काही हिंदी गाण्याच्या संगीतावर इंग्रजी गाणे गायले आहे. ‘अजीब दास्ता हें ये’ ह्या लतादिदींच्या प्रसिद्ध गाण्यावरचे हे गाणे Island Song (https://youtu.be/U86_C_9hp3Y) आणिपुकारता  चला हूं मै’ ह्या मोहम्मद रफी ह्यांच्या  गाण्यावरचे I hear the call, the call of spring (https://youtu.be/Cbjv4IfisOw?t=10). दोन्ही गाण्यांचा पूर्ण सन्मान ठेवून तिने remix केले आहेत.  

मूळ ‘अजीब दास्ता हें ये’ (https://youtu.be/AU-hut9lGQ4?t=5) हे शंकर जयकिशन ह्यांनी १९६० मध्ये तयार केले. गाण्यात गिटार आणि brass section चा अप्रतिम मेळ घातला आहे. तसेच brass section आणि कोरसचा पण अप्रतिम मेळ घातला आहे. माझ्या मते हे गाणे काळापुढे होते. शंकर जयकिशन हे दोघेही भारतीय शास्त्रीय संगीताचे जाणकार होते आणि विधीवत प्रशिक्षण घेतले होते.

मूळ ‘पुकारता  चला हूं मै’ (https://youtu.be/pp4udOzbLRU?t=5) हे . पी. नय्यर ह्यांनी १९६५ मध्ये तयार केले. गाण्याचे वैशिष्ट्य String section आहे. गाण्यात गिटार, संतूर आणि मेंडोलिनचा अप्रतिम मेल आहे. गाण्यातला गिटार कानात घुमत असतो. ओ. पी. नय्यर ह्यांनी संगीताचे तसे विधीवत शिक्षण घेतले नाही त्यामुळे ते नैसर्गिक संगीतकार होते.  नय्यर ह्यांनी एका मुलाखतीत सांगितले. . अमीर खान त्यांना म्हणाले की तुमच्या गाण्यात १५ रागांची झलक असते. तुम्ही शास्त्रीय संगीत शिकले नाही हे चांगले केलेत. ही गाणी तयार झालीत तेव्हा सबॅस्टिअन डिसुझा हे शंकर जयकिशन आणि . पी. नय्यर ह्या दोघांचेही arranger होते. ते गाण्याच्या composition मध्ये स्पष्ट दिसते. हिंदी चित्रपट सृष्टीत दहा एक संगीतकार आणि आठ एक गायक असे आहेत की त्यांना एक दोन पानात बसवणे म्हणजे अशक्य तर आहेच पण ते सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे म्हणून त्यांच्यावर मी काही लिहीत नाही.

Ivy York हीने हा album २००९ मध्ये केला म्हणजे साधारण ५० वर्षांनी केला. म्हणजे ही गाणी किती विलक्षण होती ते दाखवते. दुर्दैवाने तिने २०१० पासून गाणे बंद केले. नाहीतर अशीच सुंदर गाणी आज World Music म्हणुन प्रसिद्ध झाली असती.

सतीश गुंडावार

-मे-२०२१

1 comment: