Sunday 18 April 2021

रत्नभूमी गोमांतक

गोमांतक म्हणजेच गोवा तिथल्या समुद्र किनारे आणि सृष्टी सौन्दर्यासाठी प्रसिद्ध आहे. गोव्याचे क्षेत्रफळ एखाद्या जिल्ह्याएवढे पण संगीत, कला, साहित्य, नाटक ह्यातले गोव्याचे योगदान एखाद्या मोठया राज्याला लाजवेल असे आहे. विषयाच्या व्याप्तीमुळे हा ब्लॉग हिंदी चित्रपट संगीता पुरताच मर्यादित ठेवत आहे. गोव्यात पोर्तुगीज चर्च मध्ये पाश्चान्त्य संगीत सक्तीचे होते. त्यामुळे गोव्यात पाश्चान्त्य संगीत आणि वाद्य येणाऱ्यांची खुप मोठी संख्या होती. जॅझ संगीत भारतात तसे लगेच आले आणि १९४५ च्या सुमारास चित्रपट संगीतात यायला लागले. मुंबई हे असे melting pot आहे की जिथे सर्व संस्कृती आल्या, रुजल्या आणि पल्लवित झाल्या. सुरुवातीला जॅझ वादक परदेशातून यायचे. नंतर हळुहळु गोव्यातले वादक त्यांची जागा घेऊ लागले.  भारतीय संगीत हे Melody आणि Rhythm ने परिपूर्ण पण harmony चा अभाव. पण पाश्चान्त्य संगीत आणि जॅझ मध्ये harmony महत्वाची असते. भारतीय संगीतात पाठांतरावर भर तर पाश्चान्त्य संगीतात staff notation चा वापर. जसे जसे हिंदी चित्रपट संगीताचे संगीत भव्य होत गेले तस तसे ह्या संगीतकारांना संगीत लिहण्याची गरज भासू लागली. गोव्यातले वादक staff notation लिहण्यात आणि वाचण्यात तरबेज होते. त्या सुवर्ण काळातील सर्वच संगीतकार हे भारतीय संगीताचे मोठे जाणकार होते. त्यांना ह्या गोव्यातल्या पाश्चान्त्य संगीतात प्रशिक्षित वादकांची साथ लाभली आणि एक जागतिक संगीताचा जन्म झाला. World Music हा शब्द जगात प्रचलित व्हायच्या आधीच हिंदी चित्रपटात World Music किंवा Fusion Music १९४५-५० च्या काळात स्थिर झाले होते.

१९४५ ते १९९० पर्यंतची गाणी आपण आजही आवडीने ऐकतो. त्यातली कधी काही वाद्य किंवा संगीत रचना मनावर कायमची कोरली जाते. कित्येक गाण्याचे intro सुरु झाले तरी आपल्याला गाणे आठवते. हिंदी चित्रपट संगीत हे गीतकार, संगीतकार आणि गायक ह्यांना मान्यता देते. पण ज्या वादकांनी ते गाणे वाजवले त्यांची नाव सहसा कोणाला माहित नसते. ‘बचना है हसींनो’ च्या सुरुवातीला trumpet चा सुंदर intro आहे. तो कोणी वाजवला हे विचारले तर तो बऱ्याच जणांना माहीतच नसते. ह्या वादकांच्या आणि संगीतकारांच्या मध्ये अजून काही लोक म्हणजे Music Assistant, Music Arrangers आणि Music Conductors असतात. ह्यांचे काम संगीतकाराने सांगितलेल्या चालीला संगीताने सजवायचे. Intro, Prelude, interlude तयार करायचे, त्यासाठी वाद्यांची निवड करायची, त्यांचा मेळ साधायचा, notation लिहायची, वादकांकडून सराव करून घ्यायचा आणि final recording ला ते conduct करायचे. इतके महत्वाचे योगदान करणाऱ्या ह्या Music Arrangers चे आणि वादकांचे नाव सहसा कोणाला माहित नसते किंवा ह्याची साधी कुठे नोंद असते. १९४५ ते १९९० च्या काळात गोव्याच्या Music Arrangers आणि वादकांचा हिंदी चित्रपट सृष्टीत दबदबा होता. अश्या अनामिक लोकांबद्दल लिहण्याचा हा माझा छोटा प्रयत्न.

ह्या यादीत सर्वात पहिले जर कोणाचे नाव घ्यावे तर ते ऍंथोनी गोंझाल्वेस ह्यांचे घ्यावे लागेल. स्वतः उत्तम व्हायोलिन वादक. नौशाद ह्यांच्या बरोबर arranger म्हणून खुप काम केले. तिथे त्यांना भारतीय संगीतातल्या melody आणि rhythm ने आकर्षित केले. पुढे त्यांनी भारतीय रागांवर symphony तयार केल्यात. हे गोव्यातून आलेले आद्य arranger म्हणावे लागेल. ह्यांच्या कामामुळे इतर संगीतकार गोव्यातल्या वादकांकडे वळलेत असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांचा सन्मान एवढा होता की ‘अमर अकबर ऍंथोनी’ ह्या चित्रपटातील "My Name is Anthony Gozalves” हे गाणे प्यारेलालने आपल्या गुरूला समर्पित केले आहे. ऍंथोनी गोंझाल्वेस ह्यांनी संगीतकार प्यारेलाल आणि आर. डी. बर्मन ह्यांना आणि अनेक जणांना व्हायोलिन शिकवले.                 

जॉनी गोम्स आणि जो गोम्स हे दोघे बंधू संगीतकार सि. रामचंद्र ह्यांचे music arrangers. ही दोघे संगीतकार चित्रगुप्त ह्यांचे पण music arrangers होते. दोघे उत्तम Violin, Clarinet आणि Alto Saxophone वाजवायचे. १९५० च्या नंतरची सि. रामचंद्र आणि चित्रगुप्तची गाणी ऐकली तर त्या गाण्यात harmony नक्की ऐकायला मिळेल. गाण्यात cello किंवा double bass चा वापर harmony साठी नक्की दिसेल. तेव्हा पासून हिंदी गाण्यात melody, rhythm आणि harmony हे तिन्ही ऐकायला मिळायला सुरुवात झाली. जॉनी गोम्स आणि जो गोम्स ह्यांनी arrangement केलेली बरीच चित्रपट आहेत. काही गाणी पुढे लेखात येतीलच.

शंकर जयकिशन ह्यांना सुरुवातीला सनी कॅस्टेलिनो ह्या arranger ने मदत केली. ‘आग’,बरसात’ मध्ये त्यांनी बहुदा music arrangement केली असावी. त्यांनी . पी. नय्यर ह्यांचे पण संगीत संयोजन केले. ‘पुछोना हमें हम उनके लिये’ ह्या गाण्यातला पियानो त्यांनीच वाजवला आहेपुढे १९५२ मध्ये सनी कॅस्टेलिनोने त्यांचा मित्र सेबास्टियन डिसुझा ह्यांची शंकर जयकिशन सोबत ओळख करून दिली.

येथून हिंदी चित्रपट संगीताच्या नवीन इतिहासाला सुरुवात झाली. सेबास्टियन डिसुझाने अगदी शेवट पर्यंत शंकर जयकिशन ह्यांना music arrangement करून दिली. त्यांनी . पी. नय्यर आणि सलील चौधरी ह्यांना पण music arrangement करून दिली. तब्बल १७५ चित्रपटांचे music arrangement आणि पार्श्वसंगीत त्यांनी दिले. आधी सांगितल्यानुसार ह्या गोव्यातल्या वादकांनी हिंदी गाण्यांना harmony दिली. ‘मेरा नाम चीन चीन चू’ (https://youtu.be/cQjXKdyp_wM) हे गाणे ऐका. Double bass चा वापर harmony साठी केलेला आहे. पण सेबास्टियन बऱ्याच नवीन गोष्टी दिल्यात. त्यांनी counter melody हिंदी गाण्यात पहिल्यांदा आणली. मुख्य melody च्या बरोबर मागे अजून एक उप melody असते त्याला counter melody म्हणतात. हा पाश्चिमात्य प्रकार सेबास्टियनने हिंदी गाण्यात आणला. 'रात के हमसफर' (https://youtu.be/OPaUm-UxdhY) ह्या गाण्याचा intro बारकाईने ऐका. तुम्हाला counter melody ऐकायला मिळेल. कोरस आणि violin ह्यांची melody ही त्यांची दुसरी देण. ‘दिल के झरोके में तुजको बिठाकर’ (https://youtu.be/v9BfZf1x5ZU?t=14) हे गाणे तसे landmark गाणे ते पुढे सांगीलच. पण ह्या गाण्यात सेबास्टियनने counter melody, कोरस आणि violin ची melody वापर केल्याचे उत्तम उदाहरण आहे. ह्याचे थोडे जुने उदाहरण म्हणजे 'आ अब लौट चले' (https://youtu.be/H8Fu_O7y-dg) हे ऐतिहासिक गाणे आहे. String section, brass section, rhythm, कोरसचा वापर करत melody आणि harmony असलेले परीपूर्ण गाणे आहे. गाण्याच्या शेवटी शेवटी grand music arrangement आहे. हे १९६१ सालचे गाणे आहे! असे संगीतबद्ध केलेले गाणे आता दाखवा. सेबास्टियनने फक्त पाश्चिमात्य संगीत तयार केले असे नाही. भारतीय संगीताचा पण सुंदर वापर त्यांनी त्यांच्या arrangement मध्ये केला. 'आजा रे परदेसी’ (https://youtu.be/Mm21SSgUHe8) हे गाणे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जसे अगोदर सांगितले त्यांनी ओ. पी. नय्यर आणि सलील चौधरी सोबत पण काम केले. पण ह्या तिघांच्या संगीतात सारखेपणा येवू दिला नाही. सेबास्टियनने केलेली arrangement पुढे हिंदी चित्रपट संगीतात template बनली. नंतरच्या संगीत arrangement ही template तुम्हाला वारंवार दिसेल.

सेबास्टियनचे नाव घेतले तर त्या बरोबर दत्ताराम वाडकर ह्यांचे नाव लगेच घ्यावे लागेल. दत्ताराम पण गोव्याचे. सेबास्टियन बरोबर दत्तारामने शंकर जयकिशनसाठी arrangement केली. दत्ताराम संगीतकार शंकरचे चांगले मित्र होते. त्यांनी पृथ्वी थिएटर पासून एकत्र काम केले होते. पुढे जेव्हा शंकर जयकिशन स्वतंत्र संगीत देऊ लागले तेव्हा पासून तर अगदी शेवट पर्यंत दत्तारामने शंकर जयकिशनसाठी संगीत संयोजन केले. दत्ताराम स्वतः उत्तम तबला आणि ढोलक वाजवायचे. सेबास्टियन String section आणि brass section तर दत्ताराम rhythm section सांभाळायचे. वर दिलेल्या गाण्याचे rhythm arrangement दत्तारामने केले आहे. पुढे दत्ताराम स्वतंत्र संगीतकार झाले. पण शंकर जयकिशन ह्यांना कधीच सोडले नाही. दत्तारामने स्वतंत्र संगीतकार म्हणून 'अब दिल्ली दूर नही' ह्या चित्रपटाचे संगीत दिले. त्यातले ‘चुन चुन करती आयी चिडिया’ (https://youtu.be/CsL82QnlqlM) हे गाणे महत्वाचे म्हणावे लागेल. ह्यातला ठेका (rhythm) ऐका. पुढे जाऊन हा ठेका हिंदी चित्रपटात खूप गाजला. ह्या ठेक्याला आजही दत्ताराम ठेका म्हणूनच ओळखले जाते. संगीतकार म्हणून त्यांची बरीच गाणी गाजली. 'न जाने कहा तुम थे' (https://youtu.be/wU1pdUUhmkg) हे ऐकले आहेच. ‘आसू भरी ये जीवन की राहें’ (https://youtu.be/9UE-LcQ5NNg) हे गाणे पुढे लतादीदींनी 'My Tribute' ह्या album मध्ये गायले आहे. त्यावरून ते किती प्रतिभावान होते ह्याची प्रचिती येते. ‘हाल ए दिल हमारा’ (https://youtu.be/ITG7Y6eJY4A), ‘मस्ती भरा है समा’ (https://youtu.be/fbXiAJT4Bzs), मिठी मिठी बातोसे बचना जरा (https://youtu.be/RsH24zE_oHI) ही काही त्यांची अप्रतिम गाणी. त्यांनी १५ ते १८ चित्रपटांना संगीत दिले आणि जवळ जवळ सर्व संगीतकारांसाठी ताल वाद्य वाजवले.

आता मराठी माणसाचे नाव आलेच तर अजून एक नाव. एन. दत्ता (दत्ता नाईक) हे अजून एक गोव्याच्या मातीतून निघालेले रत्न. सुरुवातीला सचिनदेव बर्मनची music arrangement केली. ते गुलाम हैदर ह्यांचे पण संगीत संयोजक होते.  पुढे ते स्वतंत्र संगीतकार म्हणून बरेच काम केले. मराठी रसिकांना त्यांची मराठी गाणी माहीतच आहेत. पण त्यांची काही निवडक हिंदी गाणी, 'मैं तुम्हीसे पुछती हू मुझे तुमसे प्यार क्यो है' (ह्या गाण्यातली अभिनेत्री मेहमूद ची बहीण आहे बरे का!) (https://youtu.be/aYUdzZUkKbQ), ‘धडकने लगी दिल की तारो की दुनिया’ (https://youtu.be/9d4EeM7X1Ng?t=10), ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ (https://youtu.be/9urIZUwblKg?t=5), ‘संभल दिल’ (https://youtu.be/6LYN6XIt8Hs?t=5) आणि बरीच अशीं सुंदर गाणी त्यांनी दिलीत.

गोव्याचे अजून एक महान music arranger म्हणजे फ्रॅंक फेर्नांडिस (फर्नाड). त्यांनी अनिल बिस्वास, शंकर जयकिशन, रोशन, सि. रामचंद्र, कल्याणजी आनंदजी सोबत काम केले. एकंदर ८० चित्रपटाचे संगीत संयोजन त्यांनी केले. डॉन, जंजीर, हेर फेरी, जॉनी मेरा नाम ही काही त्यांची निवडक चित्रपट.

आत्तापर्यंत music arrangers बद्दल लिहले. काही एकल (solo) वादन करणारे वादक गोव्यातून आले. पियानो, trumpet, saxophone, violin, drum वाजवणारे legends गोव्यातून आलेत. गोव्याच्या धरतीतून बरेच pianist आलेत. त्यात रॉबर्ट कोरिया ह्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेलमागेदिल के झरोके में तुजको बिठाकर’ हे landmark गाणे आहे असे लिहले होते. ह्या गाण्याचा intro दिड मिनिटांचा आहे! एवढा मोठा intro क्वचितच ऐकायला मिळतो. हे गाणे पियानोचे landmark गाणे मानले जाते. पियानोसाठी हे गाणे अजून एकदा ऐका. ह्या गाण्यात पियानो रॉबर्ट कोरिया ह्यांनी वाजवला आहे. ‘मुझे तुम मिल गये हमदम’ (https://youtu.be/lVh-7uFaFwA) ह्या गाण्यातला पियानो त्यांनीच वाजवला आहे. माईक मचाडो अजून एक पियानिस्ट होते. त्यांनी 'प्यार दिवाना होता है' (https://youtu.be/lslZptXok8o) ह्या गाण्यात पियानो वाजवला आहे. सनी कॅस्टेलिनो बद्दल आधीच लिहले आहे.

Trumpet हे अतिशय गोड वाद्य आहे. Brass section मधील महत्वाचे वाद्य. अगदी सुरुवातीपासून हिंदी गाण्यात हे वाद्य आपण ऐकले आहे. गोव्यातून trumpet वाजवणारे खूप वादक आलेत. त्यात Chic Chocolate (Antonio Xavier Vaz) हे अग्रणी मानावे लागेल. सि. रामचंद्र ह्यांच्या बऱ्याच गाण्यात त्यांनी trumpet वाजवला आहे. त्यांनी मदन मोहन, खय्याम सोबत पण काम केले आहे. ‘अलबेला’ ह्या प्रसिद्ध चित्रपटातील ‘दिवाना परवाना’ (https://youtu.be/xfhqnxrIabE) ह्या गाण्यात त्यांनी muted trumpet वाजवला आहे. ह्या गाण्यात मागे trumpet वाजवतांना जे दिसतात ते Chic Chocolate आहेत. त्यांचा स्वतःचा स्वतंत्र जॅझ बँड त्यावेळी होता आणि तो खूप प्रसिद्ध होता. हे गाणे हिट झाल्यावर ह्या गाण्यातला costume त्यांचा बँड घालायचा. ‘गोरे गोरे ओ बाके छोरे’ (https://youtu.be/WkErlBw-8_k), ‘इना मीना डिका’ (https://youtu.be/Se1EZCE_zLo) ह्यात पण त्यांनीच trumpet वाजवला आहे. ‘रुत जवान जवान’ (https://youtu.be/4JeLUNj80yU) ह्या गाण्यात पण Chic Chocolate ह्यांचे close-up आहेत. एवढा सन्मान त्या काळात त्यांना होता. (भूपिंदर सिंग ह्यांचे हिंदी चित्रपट कारकिर्दीतील हे पहिले गाणे आणि गाणे पण त्यांच्यावरच चित्रित केले आहे.) Chic Chocolate ला समकालीन पण नंतर बरेच वर्ष काम केलेले क्रिस पेरी. Trumpet आणि alto saxophone वाजवणारे. संगीतकार खय्याम ह्यांचे 'कभी कभी', 'त्रिशुल' ह्या चित्रपटात संगीत संयोजक म्हणून काम केले. लक्ष्मीकांत प्यारेलाल, पंचम बरोबर पण खूप काम केले. Trumpet वादकात जॉर्ज फेर्नांडिस ह्यांचे नाव घेतल्या शिवाय ही यादी पूर्ण होऊ शकत नाही. 'बचना है हसींनो' (https://youtu.be/9HVI7TPWiJM) ह्या गाण्याच्या intro मध्ये एक मोठा trumpet चा तुकडा आहे जो त्या चित्रपटाची एक signature tune म्हणून प्रसिद्ध झाला. ‘चुरालिया है तुमने जो दिल को’ (https://youtu.be/_R7Po4Wpbj8), ‘आने वाला पल, जाने वाला है’  (https://youtu.be/xobeTscjOM0?t=10) जॉर्ज हे पंचम ह्यांच्या ग्रुप मधील कायमचे सदस्य होते. शोले, तिसरी मंझिल, हम किसीसे कम नही, सागर, बॉबी, आनंद सारख्या चित्रपटात त्यांनी trumpet वाजवले आहे.


लेखाच्या शेवटी Bass Guitar वाजवणारे टोनी वाझ. आर. डी. बर्मन ह्यांच्या टीमचे प्रमुख वादक. आज Bass Guitar वाजवणाऱ्यांचे Idol. पंकज कांथ ह्याने त्यांच्या सन्मानार्थ एक series केली आहे. Bass Guitar चा सर्वात चांगला उपयोग आर. डी. बर्मनने केला आणि त्याचे संपूर्ण श्रेय टोनी वाझ ह्यांना द्यावे लागेल. Bass Guitar चा मूळ उपयोग harmony देण्यासाठी होतो पण पंचमने त्याचा rhythm आणि melody साठी केला. रॉकी, इजाजत, सत्ते पे सत्ता आणि अनेक चित्रपटातील गाण्यात टोनी वाझने Bass Guitar वाजवले आहे. Bass Guitar ची मजा original sound track मध्येच येते म्हणून sound track देत आहे आणि headset महत्वाचे. साध्या speakers मध्ये Bass Guitar चा आवाज येतच नाही.

Bass Guitar चे सर्वात सुंदर गाणे म्हणजे रॉकी ह्या चित्रपटातील 'क्या यही प्यार है' (https://youtu.be/9z6EEprP4rA), ‘मेरा कुछ सामान’ (https://youtu.be/znqL717vigw), ‘सत्ते पे सत्ता’ मध्ये खूप गाण्यात bass guitar आहे पण ‘दिलबर मेरे कब तक मुझे’ (https://youtu.be/LI84IvrQ8Nc) सुरेल आहे. ‘जान ए जा ढुंडता फिर रहा’ (https://youtu.be/ocb-UQtl854), ‘तू तू है वही’ (https://youtu.be/9cDN-s8mLvU) ही त्यांची काही विशेष गाणी.

ह्या लेखात दिलेल्या माहितीची सत्यता पडताळणे अतिशय कठीण आहे. ह्याचे कारण की ह्यांची नोंद कुठेही ठेवली गेली नाही. म्हणून ही माहिती ऐकीव आहे. शोले चित्रपटात Harmonica (Mouth Organ) चा piece सर्वांना माहित आहे. तो मी वाजवला आहे असे म्हणणारे दोन तीन जण आहेत.

ह्या मंडळींची आठवण किंवा त्यांच्या बद्दल आदर ह्यासाठी असला पाहिजे कारण कित्येक intro, interlude, prelude हे music arrangers ने तयार केलेले असतात पण नाव संगीतकाराचे होते. तसेच एकल (solo) वादन करणारे वादक हे स्वतः ठरवायचे की काय वाजवायचे. संगीत संयोजक सुरुवात ह्या स्वरापासून करायची तर ह्या स्वरावर सोडायचे इतकेच ह्या गुणी वादकांना सांगायचे. मग हे वादक पुर्ण piece स्वतः ठरवायचे. टोनी वाझला composition सांगितले की ते स्वतः bass guitar चे notation लिहून स्वतःच्या मनाने वाजायचे. त्यामुळे त्यांच्या वाजवण्याचे notation मिळत नाही. पंकज कांथ सारख्याने reverse engineering करून notation शोधून काढलेत.

ही तर खूपच लहान यादी आहे. अजून असे अनेक वादक आहेत. Martin Pinto, C. Franko, Albert D’costa, Arthur Pareira, Francis Vaz (drum), Monsorate Brothers (Ronnie – Piano, Joseph – Trumpet, Bosco – Trumpet, Blasco – Trombone) आणि शेकडो violin वादक ह्यांच्या बद्दल फारशी माहिती मिळत नाही.

हे झाले वादक. पण गायकांमध्ये हेमा सरदेसाई, रेमो फेर्नांडीस आणि भारताला लागलेले स्वप्न असे सर्व मंगेशकर कुटुंब गोव्याचेच ना! ह्या गोव्याच्या कलाकारांनी फक्त मुंबईत काम केले असे म्हटले तर चुकीचे ठरेल. फाळणी आधी कराची, लाहोर मध्ये पण हेच वादक होते. नंतर कलकत्ता, मद्रास इथल्या संगीत सृष्टीत हेच कलाकार होते. ह्यात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील यादी टाकली तर? पं. तुलसीदास बोरकर, प्रभाकर कारेकर, मोगुबाई मुर्डीकर, शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेकी आणि सर्वात श्रेष्ठ मा. दीनानाथ मंगेशकर हे गोव्याचेच. गोव्या सारख्या एवढ्या छोट्या राज्याचे हे संगीतातील योगदान अचंबित करणारे आहे. ह्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटासा प्रपंच!


सतीश गुंडावार

१८-एप्रिल-२०२१

8 comments:

  1. फारच छान सचिव As you rightly said...many of these artists are not very well known as they worked in background but their contribution is pivotal to evolution of Bollywood music...must read for every music lover!

    ReplyDelete
  2. खूप छान, सतीश

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर लेखन सतीश....

    ॠतुराज

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर लेखन सतीश....

    ॠतुराज

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिले आहे सतीश

    ReplyDelete
  6. खूप छान लेख....

    ReplyDelete