Saturday 10 April 2021

अष्ट पुत्र सौभाग्यवती भव

काही वर्षांपुर्वी रा. स्व. संघाचे त्यावेळचे . पु. सरसंघचालक श्री सुदर्शनजी म्हणाले की प्रत्येक हिंदु कुटुंबाला अपत्य असावीत. त्यावेळी तथाकथित पुरोगामी माध्यमाने त्यांच्यावर खुप टिका केली. देशाची लोकसंख्या इतकी वाढत आहे की लोकसंख्येचा स्फोट होत आहे आणि सुदर्शनजी अपत्याचा सल्ला देत आहेत. मला मा. सुदर्शनजींच्या वक्तव्यात काही टिका करण्यासारखे वाटले नाही. ते समाज हिताचे विधान होते असे मला त्यावेळी वाटले. पुढे एकदा मा. भागयाजींने (रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकर्ते) सुध्दा एका वैयक्तिक चर्चेत हाच विषय मांडला. ते म्हणाले ज्या घरी एक अपत्य त्या घरात नेहमी असुरक्षितता असेल, दोन अपत्य असतील तर समाधान आणि तीन अपत्य असतील तर कुटुंबात सुख, समाधान, आणि आनंद नांदेल. आम्ही चार भावंडे असल्याने मा. भागयाजींच्या मताशी अनुभवावरून मी लगेच सहमत झालो. तसाही मी एक अपत्य कुटुंब पद्धतीचा नेहमीच विरोधक राहिलो आहे. गेले दोन पिढ्यांपासून आलेले हे खूळ समाज स्वास्थाला घातक आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

सध्याच्या कोरोना महामारीत मा. सुदर्शनजींच्या वाक्याची प्रखर आठवण होते. परवा माझा एक मित्र त्याच्या सहकाऱ्यांची व्यथा सांगत होता. त्या सहकाऱ्यांचा तरुण मोठा भाऊ आणि वहिनी दोघेही कोरोनात गेले. आता त्याच्यावर भावांच्या दोन लहान मुलांची जबाबदारी आली आहे. त्यात त्याची दोन मुलगे आहेत. चार मुलांची संपुर्ण जबाबदार त्यावर आली आहे. घरोघरी कोरोनाच्या प्रकोपाची कथा ऐकायला मिळते. माझ्या नातलगात वडील, त्यांची दोन होतकरु मुले कोरोनाने काही दिवसांच्या अंतराने गेलेत. कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी आता घराच्या महिला आणि तरुण मुलांवर पडली आहे. पोरके होणे हे कोणत्याची वयात फारच वेदनादायक, दुःखदायक असते. आई वडिलांचे छत्र हे परमेश्वराचा आशिर्वाद असतो. ते कोणत्याही वयात जाणे हे दुर्दैव्यच. त्यात बालपणी किंवा तरुण वयात आई किंवा वडिल किंवा दोघेही जाणे ह्या सारखे मोठे दुःख आणि संकट कोणते नाही. मी विचार करत होतो. माझ्या माहितीतील ज्या ज्या कुटुंबावर कोरोनाचे संकट आले ते कुटुंब एक अपत्य कुटुंब असते तर त्या मुलावर किती मोठे संकट आले असते. पालकांची संपत्ती, बँक ठेवी, आयुर्विमा काय कामाचे? ती कुटुंब मोठी असल्याने हा आघात सहन करण्याची काही तरी ताकद त्या कुटुंबामध्ये आहे. आज काका, मामा, आत्या, मावशी आहेत तर ते काही तरी त्या मुलांची जबाबदारी घेतील ह्याची शक्यता आहे.  

एकदा विश्व हिंदु परिषदेच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्यांने अनाथ मुलाची समस्या किती गंभीर आहे ह्याचे वर्णन मला सांगितले ते आठवले. अनाथालय भारतीय संस्कृतीला तशी नवीन संकल्पना. ख्रिश्चन मिशनरींना धर्म प्रसाराला लागणारी उपयुक्त योजना म्हणून त्यांनी भारतात आणली तरी सुद्धा समाजोपकारी आहे हे मान्य. समाजात निपुत्रिक कुटुंबामध्ये दत्तक घेण्याचे प्रमाण आहे. कोरोना महामारीने आता समाजातील प्रत्येक कुटुंबाने दत्तक घेण्याचे अभियान राबवण्याची गरज आहे. जेणे करून काही वर्षात समाज अनाथालय मुक्त होईल. ज्यांना कमी biological मुले हवीत त्यांनी जरूर कमी मुले जन्माला घालावीत पण त्यासोबत काही अनाथ मुले दत्तक घ्यावीत. असा सल्ला देणे सोपे आहे पण प्रत्यक्षात उतरवायला अतिशय कठीण आहे ह्याची जाणीव पण आहे. पण कुठून तरी सुरवात व्हायला हवी. कोरोनाच्या संकटात समाजाने हा नवा बदल घ्यायला हरकत नाही.

चीनचा कोरोना प्रकल्प म्हणजे biological warfare चा prototype म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे कोरोना पेक्षा भयंकर महामारी भविष्यात येणार नाही असे कोणी ठामपणे सांगु शकत नाही. त्यामुळे समाजाने एक अपत्य कुटुंब पद्धतीचा त्याग आणि दत्तक पद्धतीचा अवलंब ह्यावर गंभीर चर्चा, चिंतन करण्याची गरज आहे. म्हणून पुरातन आशिर्वाद ‘अष्ट’ नाहीतर ‘त्रि पुत्र सौभाग्यवती भव’ असा आशिर्वाद नव्याने रुजू करण्याची गरज आहे.

 

सतीश गुंडावार

१० एप्रिल २०२१

2 comments:

  1. Well said keep writing dear....

    ReplyDelete
  2. दोनवर समाधान मानावे. नव्या परिस्थितीत पटणारे विचार.

    ReplyDelete