हे गाणे संपताच अजून एक भूपिंदरसिंगचे गाणे लागले. त्यामुळे मनात त्यांच्या बद्दल विविध विचार मनात यायला लागले. त्यांची अनेक लोकप्रिय गीते मनात फिरू लागली. भूपिंदरसिंग अप्रतिम गायक तर होतेच पण उत्कृष्ठ गिटार वादक होते. राहुल देव बर्मन ह्यांच्या वादक समूहातील एक महत्वाचे गिटार वादक होते. रमेश अय्यर, भूपिंदरसिंग आणि भानु गुप्ता हे acoustic किंवा electric गिटार वाजवायचे तर टोनी वाझ Bass गिटार वाजायचे. ह्या चौकडीची अनेक सुंदर हिंदी गाणी दिली आहेत. मग असाच विचार आला की राहुल देव बर्मनच्या नवरत्नांपैकी आता मोजचेक लोक जीवंत आहे. राहुल देव बर्मनच्या संगीत निर्मितीचे सूत्र आणि राज जाणणारे भूपिंदरसिंग हे एक आहेत. संधी मिळाली तर त्यांना भेटले पाहिजे.
इतक्यात दारावर वर्तमानपत्र आला. पेपर उचलला तर पहिल्याच पानावर दुःखद बातमी की भूपिंदरसिंग आता ह्या दुनियेतून निघून गेले. सकाळचा सुखद धक्का दुःखामध्ये बदलला. माझ्या To Do List मध्ये भूपिंदरसिंगचे नाव वर आहे. त्यांच्यावर एक ब्लॉग नक्की लिहणार. पण आज ते गेल्याने मन सुन्न आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. हिंदी चित्रपटाच्या सुवर्ण युगातील एक कलाकार आणि साक्षीदार आज पडद्याआड गेला. माझ्या तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
https://youtu.be/4JeLUNj80yU
सतीश गुंडावार
१९-जुलै-२०२२
No comments:
Post a Comment