Friday, 28 January 2022

योगेश

ऱ्याचदा असा विचार येतोकी एखाद्या कलेचा किंवा प्रतिभेचा अविष्कार कशावर अवलंबुन असतो? शिक्षण, जीवनाचा अनुभव की दैवी देणगी की सर्वच? पण जगातकाही असे मंडळी येतात जे जगण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी ज्या कलेची कोणतीही पार्श्वभुमी नसतांना ती कला आत्मसात करतात आणि आपले वेगळे स्थान निर्माण करतात. अशा मंडळींमध्ये योगेश गौर म्हणजेच कवी योगेश ह्यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या जीवनाची कथा एका सिनेमाला लाजवेल अशी आहे. वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी घ्यावी लागली. मुंबईत आतेभाऊसिने सृष्टीत नावाजलेले नाव होते त्यांच्या मदतीने काहीतरी काम मिळेल ह्या आशेने ते मुंबईला आले. मुंबईला येतांना त्यांचा मित्र सत्यप्रकाश तिवारी (सत्तू) जो घराचा खुप श्रीमंत होता पण मित्र मुंबईत एकटा काय करेल म्हणुन तो पण योगेश सोबत मुंबईला आला. तेव्हा वय फक्त १६-१७ होते. वडिलांनी आत्या आणि त्यांच्या कुटुंबाचे पुर्ण सांभाळ केला होता. योगेश ह्यांना वाटले की त्या उपकाराची परतफेड आतेभाऊ करेल पण नियतीने काहीतरी वेगळेच त्यांच्यासाठी नेमले होते. योगेश आणि सत्तू त्यांच्या आतेभावाकडे गेलेत पण आतेभावाने ज्याप्रकारे मदत करायचे नाकारले तेव्हा सत्तूने ठरवले की योगेशने सिनेसृष्टीतच नाव केले पाहिजे. तसा त्याचा आग्रह असे. तो योगेशला जगायला कोणतीही नौकरी करू देई ना. योगेशला पण प्रश्न पडायचे की सिनेसृष्टीत काय काम करू शकणार. मुंबईत जगणे कठीण होते. सत्तूने जगण्यासाठी परिश्रम करायचे आणि योगेशने फक्त सिनेमामध्ये काम मिळण्याचे प्रयत्न करायचे.


मित्राची इच्छा आणि नियतीचा खेळ एक दिवस योगेश गीतकार झाले. कमी बजेटचे चित्रपट त्यावेळी पण बनायचे. १९६२ साली “सखी रॉबिन” ह्या चित्रपटासाठी संगीतकार रॉबिन बॅनर्जी ह्यांनी त्यांना संधी दिली. पहिल्याच संधीचे सोनं करत चित्रपटातील सर्व गाणी हीट झालीत. मन्नाडे आणि सुमन कल्याणपूर ह्यांचे "तुम जो आवो तो प्यार आ जाये" (https://youtu.be/sey4T0dtO6oह्या गाण्याने त्यांचे चित्रपट सृष्टी दमदार प्रवेश झाला. 

रॉबिन बॅनर्जी सोबत कमी बजेटची अनेक चित्रपट केलीतकाहीत नाव झालेतर काहीत झाले नाहीकाही ठिकाणी नावाचा उल्लेख पण नाहीदरम्यान गुलझार आणि अंजान सारख्या गीतकारांसोबत खूप काम केलीत्यांच्या कारकिर्दीला घडण्यात मदत केलीचित्रपट सृष्टीतील वर्णभेद सर्वश्रुत आहेकमी बजेटच्या चित्रपट सृष्टीतील कलाकारांनामोठ्या बॅनरची कामे मिळायला परीसस्पर्शाची गरज होतीती वाट पण खडतरत्या वाटेत उषा खन्ना सारख्यानी मोलाची मदत केली (उषा खन्नानी अश्या अनेक उदयोन्मुख मोठे होण्यात मदत केलीअसो!) १९६९ मध्ये "सौ बार बनाकर मालिक ने(https://youtu.be/ltffFkxuCWMहे गाणे योगेशने त्यांच्यासाठी लिहिले.

तब्बल एक दशकाने त्यांच्या कारकिर्दीला मोठे वळण मिळाले ते १९७१ च्या "आनंद" ह्या चित्रपटाने. ह्या चित्रपटातील "कही दूर जब दिन ढल जाये" (https://youtu.be/wjYK67cgNKc) ह्या गाण्यातील “कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं से निकल आए जनमों के नाते” ही ओळ त्यांच्या मित्राशिवाय त्यांचे जीवन पुर्ण होत नाही हे आवर्जुन आठवण करून देतात. आणि "जिंदगी कैसी है पहेली हाये" (https://youtu.be/-y6_cFZsMJA) ही दोन गाणी हिंदी चित्रपट गीत रसिकांचे all time favorite आहेत. ह्या चित्रपटाचे शीर्षक गीत योगेशना एक गाणे देण्यासाठी टाकण्यात आले. “आनंद” पासून योगेश आणि सलिलदा ह्यांची जोडी जमली आणि नंतर दोघांनी एकाहून एक उत्तम गाणी दिलीत. "अन्नदाता" मधील "गुजर जाये दिन दिन" (https://youtu.be/zrNLSVvdGOY)"रजनीगंधा" मधील "कई बार यु ही देखा है" (https://youtu.be/CPwbi-hfenI), ह्या गाण्यात पुरुषाच्या स्वछंदी स्वभावाचे नेमके वर्णन "किसको मीत बनाऊँ, किसकी प्रीत भुलाऊँ" ही योगेश ह्यांची शैली. "छोटीसी बात" मधील "न जाने क्यो होता है ये जिंदगी के साथ" (https://youtu.be/7-x-skKZ0-k), ह्या गाण्यात प्रेयसीच्या व्याकुळ मनाचा नेमका ठाव वो अंजान पल ढल गये कल, आज वो रंग बदल बदल, मन को मचल मचल रहें” त्यांनी अगदी सोप्या शब्दात अंकीत केले आहे. "आनंद महल" मधील हे classical based गाणे (https://youtu.be/1q5gYjNXG_I) चिरकाल रसिकांच्या मनात घर करणारे आहे. ही सर्व गाणी संगीत आणि गायकी साठी उच्च पातळीचे आहेत पण लेख गीतकारावर असल्याने त्यावर लिहायचा मोह आवरत आहे.

त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या गाण्यात उर्दूचा परिणाम दिसतो. ते कदाचित गीतकारांना गीत लिहतांना बरेच बंधन असतात त्यामुळे असतील. पण सलिलदा पासून त्यांच्या गाण्यात हिंदीला जास्त प्राधान्य दिलेले दिसते. योगेश ह्यांची लेखन शैली फारच सरळ आणि सोपी होती. दोन किंवा तीन अक्षरांचे शब्द त्यांच्या काव्यात जास्त दिसतील. कोणतेही क्लिष्ट शब्द त्यांनी वापरले नाहीत. सर्व सामान्य माणूस ज्या भावना समजू शकेल असे त्यांचे काव्य असायचे. त्यांच्या बऱ्याच गाण्यात त्यांचा मित्र सत्तूचे त्यांच्या जीवनातील महत्व हे वारंवार दिसून येते. त्यांनी नेहमीच हे सांगितले आहे. म्हणून मी म्हणतो की योगेश ह्यांचे जीवन एखाद्या चित्रपट सारखी आहे.

योगेश स्वतःचा प्रचार करण्यात कदाचित कमी पडले असतीलत्यामुळे त्यांनी मोजक्याच लोकांसोबत काम केले आणि मोजकेच गाणी लिहिली पण ती सर्व मोत्यांसारखी आहेतयोगेशने राजेश रोशन सोबत पण चांगले काम केले आहे"बातों बातों में" मधील "सुनिये कहिये कहिये सुनिये" (https://youtu.be/KkNv_za3G1Qआणि "कोई रोको ना दिवाने को" (https://youtu.be/iwAabtCQcXY)सलिलदांचा परीसस्पर्श झाल्यानंतर एसडीबर्मन आणि आरडीबर्मन ह्यांच्याबरोबर काम केले नाही तर नवलचएसडीबर्मन बरोबर केलेला "मिली" ह्या चित्रपटातील सर्वच गाणी उत्तम आहेत"बडी सुनी सुनी है जिंदगी" (https://youtu.be/Sg49wfzCOukहे मार्मिक गाणे योगेशच नाही तर एसडीआणि किशोरकुमार साठी भावनिक गुंतागुंतीचे आहेरसिकांना हा इतिहास माहीत आहेचपंचम बरोबर त्यांनी केलेली गाणी ही पंचमच्या इतर पाश्चान्त्य आणि भव्य गाण्यापेक्षा पुर्ण वेगळी आहेत"मंजील" ह्या चित्रपटातील "रिमझिम गिरे सावन" (लतादिदी https://youtu.be/46yS0EW2cCQ) (किशोरकुमार https://youtu.be/lfJKW2lmQTQहे गाणे प्रत्येकाला पाऊस पडताना नक्कीच आठवते"शौकिन" मधील "जब भी कोई कंगना बोले" रसिकांच्या आवडीच्या गाण्यात नक्कीच असतातव्यासंगी रसिकांचे आवडते आणि पंचमने केलेल्या ह्या classical गाण्याने लेख संपवत आहेआम्हा मित्रांना पण कोड्यात टाकणारे हे गाणे असे वाटते की खुद्द ओम प्रकाश ह्यांनी गायले असावेपं वसंतराव देशपांडे आणि फैय्याज ह्यांनी गायलेले "ओ मृगनयनी चंद्रमुखी" (https://youtu.be/-eHyzXb94Fkगाण्यात फक्त संवादिनी, तबला आणि सारंगी म्हणजे पंचमच्या प्रकृतीच्या नेमके उलट गाणे. असे आगळेवेगळे योगेश तुम्हाला नक्कीच आवडेल.


सतीश गुंडावार

-जाने-२०२२

5 comments:

  1. खूप छान लिहिलेत...डॉ आनंद फाटक

    ReplyDelete
  2. खूप सुंदर. योगेश यांची सगळी गाणी डोळ्यासमोर सजीव झाली

    ReplyDelete
  3. खुप मस्त लिहले आहे

    ReplyDelete
  4. मस्त रे बापू....all his songs are gem 👌🙏

    ReplyDelete