Friday, 31 December 2021

पवारांच्या लिला

सत्तेपासून पैसा आणि पैश्यातून सत्ता ह्या तंत्रात तरबेज असलेल्या पवारांनी कोणतेही बहुमत नसतांना काॅंग्रेस सोबत १५ वर्षे आणि सर्व त्यांच्या योजनेसारखे चालले तर ही ५ वर्षे सत्तेत रहाण्यात यशस्वी होतील.

२०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपला न मागता पाठिंबा द्यायची तयारी दाखवून शिवसेनेला कात्रीत अडकवले. ह्या सर्व प्रकरणात शिवसेना ५ वर्षे सलत सत्तेत राहले जे पवारांच्या फायद्याचे ठरले. २०१९ च्या निवडणुकीनंतर अजून भाजपा आणि शिवसेनेला आपल्या तालावर नाचवत पहिले भाजपाला तोंडावर पाडले. अजीत पवारांनी शपथविधी पवारांच्या सहमती विना केली असेल हे मानण्यात मराठी माणूस खुळा नाही. पवारांना नक्की माहिती होते की भाजपा बरोबर सत्तेत राहले तर दुय्यम भुमिकेत राहावे लागेल. सत्तेतून पैसा मिळण्याची संधी तर नाहीच नाही. पण शिवसेने सोबत सत्तेत राहले तर सत्तेचे सुत्र आणि सुकाणु हे दोन्ही त्यांच्या हातात. पवारांच्या लिलेत भाजपा आणि शिवसेने मस्त फसली आणि सत्ता आपल्या ताब्यात घेतली ती पण तीन नंबरचा पक्ष असतांना!

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नवीन लिला दाखवली. मोदी आणि शहा त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही हे त्यांना नक्की माहिती आहे. पण शिवसेनेला संदेश देत आहे की भाजपासोबत आम्ही कधीही जावू शकतो. गेल्या दोन वर्षांत त्यांनी अशा काही गोष्टी शिवसेनेकडून करून घेतल्या जसे अर्नबला अटक, कंगनाचा बंगला तोडणे, राणेंना अटक की शिवसेना आणि भाजप ह्यांची भविष्यात कधीही युती होणार नाही. 

ह्या लिलेतील नुकताच घटना म्हणजे विधानसभा अध्यक्ष निवडणूक. पवार आणि ठाकरे दोघांनाही ते पद कॉंग्रेसला द्यायचेच नाही. त्यात कॉंग्रेसमध्ये ह्या पदासाठी कोण ह्यात सहमत नाही. मग खापर कोणावर फोडायचे. ते राज्यपालांवर फोडले. इतका वर्षांचा प्रशासकीय अनुभव असतांना असे नियम राज्यपाल संमत करणार नाही हे समजण्याइतके तज्ञ ते नक्कीच आहे. ह्या खेळीतर कॉंग्रेस आणि शिवसेना दोघांनाही चितपट केले. ठाकरेंना राज्यपालांना ठाकरी भाषेत पत्र लिहायला लावले.  शिवसेना आणि राज्यपाल आणि पर्यायाने भाजपाचे संबंध अजून खराब केलेत तर कॉंग्रेस पदाविना हात चोळत बसला. येत्या वित्त अधिवेशनात ते पद कॉंग्रेसला मिळवायचे असल्यास निवडणूक हा एकच मार्ग आहे. पण निवडणूक हे सरकार पडण्यास कारणीभूत होऊ शकते हे पवारांना नक्की कळते. पवारांची पुढील लिला काय असेल ते पुढे बघूच पण सध्या तरी ते भाजपा, शिवसेना आणि कॉंग्रेस ह्यांना आपल्या तालावर नाचवण्यात ते यशस्वी होत आहेत.

सतीश गुंडावार
१ जाने २०२२

1 comment: