Saturday, 1 August 2020

अब चैन से रहने दो

७० वर्षे जुने एक मस्तीभरे गाणे "शोला जो भडके दिल मेरा धडके" (https://youtu.be/xPBp45fKado) गीता बाली आणि भगवान दादा ह्यांचा डान्स आजही करावासा वाटेल असा आहे. त्यावेळी ते cult song होते आणि आज पण आहे. उत्तरप्रदेशात शाळा सुरु होतांना राष्ट्रगीतासोबत गायलेले जाणारे लतादिदीची ‘तुम्ही हो माता पिता तुम्ही हो' (https://youtu.be/qDlNiRIlPDQ) ही प्रार्थना. 'भाभी' ह्या चित्रपटातील रफींनी गायलेले 'चल उड जा रे पंछी' (https://youtu.be/XH_kWzpQ8E0) नवविवाहित वधू वडिलांचे घर सोडतानाच्या भावना मार्मिक पणे सांगतो. सलिलदांचे मोझार्टच्या symphony वर आधारित अजरामर गाणे 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' (https://youtu.be/ClAXd0itpsA). दोन प्रेमींचे हितगुज नेमक्या शब्दात गुंफले आहे. मन्ना डे ह्यांचे शास्त्रीय संगीतावर आधारलेले हे गाणे 'कौन आया मेरे मन के द्वारे'. (https://youtu.be/exZ_GR0RyTY) आशाताई आणि किशोरकुमारने वेगवेगळे गायलेले 'इना मिना डिका' (https://youtu.be/ukwf2UX6GrY) हे मस्तीभरे गाणे आजही तरुण वर्ग गातो. गीता दत्तचे त्यांचा खास शैलीतील ' दिल मुझे बता दे तू किसपे आ गया है' एका प्रेयसीच्या भावना श्रुंगारिकपणे मांडल्या आहेत (https://youtu.be/hKcaNydkNMg). अगदी अलीकडचे म्हणजे ४७ वर्षांपूर्वीचे 'पल पल दिल के पास' (https://youtu.be/AMuRRXCuy-4) प्रत्येक अन्ताक्षरीच्या खेळात येतेच. आणि मुकेशच्या अत्यंत प्रामाणिक आवाजातले हे गाणे 'भुली हुयी यादों मुझे इतना ना सतावो' (https://youtu.be/lpO4vUGXFyE) नायकाचे भूतकाळातील दुःख सरळ हृदयात टोचते. ही गाणी विविध रसातील, विविध प्रसंगावर, विविध गायकांची आणि विविध संगीतकारांनी तयार केलेली आहे. पण त्यामध्ये एक सामान धागा आहे. तो ओळखू शकाल काय? थोडे कठीण आहे पण प्रयत्न करू शकता. हिंदी चित्रपटाची गाणी ती कुठे ठेवायची ते दिग्दर्शक, संगीतकार आणि पटकथाकार वगैरे ठरवत असतील. संगीतकार त्या त्या प्रसंगासाठी विचार करून एक चाल तयार करतो. बऱ्याचदा चालीवर गाणे लिहिले जाते किंवा कधी कधी गाणे अगोदरच तयार असेल पण सांगायचे म्हणजे ते एक team work असते. मला असे वाटते की एखाद्या गाण्याचे श्रेय सारखे विभागून चित्रीकरण करणारी टीम (त्यात कलाकार आलेत), संगीतकार व त्याचा वाद्यवृंद, गायक आणि गीतकार ह्यांना द्यावा लागेल. ही वरची गाणी जेव्हा तुम्ही ऐकली/बघितली तेव्हा गायक, संगीतकार, सिनेमाचे नाव आणि कलाकार पण आठवले असेल पण एक नाव कदाचीत आठवले नसेल ते म्हणजे गाण्याचा कोण गीतकार आहे. ह्या वरील सर्व गाण्याचे गीतकार एक आहे हा तो सामान धागा. त्या गीतकारांचे नाव राजेंद्र कृष्ण (राजिंदर क्रिशन)! हिंदी चित्रपट सृष्टीतील गीतकारांच्या मांदियाळीत माझ्यासाठी अग्रक्रमातले नाव. पण सहसा लोकांना त्यांचे नाव माहीत नसते. तसे ते पण low profile राहायचे. १९५० ते १९८० च्या काळात असंख्य सिनेमांना गीत, संवाद आणि कथा लिहली परंतु सरकार दरबारात पण फारशी दखल घेतली गेली नाही असो.

राजेंद्र कृष्ण सिद्धहस्त गीतकार हिंदी, उर्दू भाषेवर प्रभुत्व. गझल, प्रेमगीत, देशभक्ती गीत, भजन, अशी सर्व प्रकार लिहली. भाषा वापरावर बंधन न ठेवता हिंदी, उर्दू आणि त्यांचे मिश्रण मुक्त पणे वापरणारा मनमौजी गीतकार. शब्दांशी खेळायला त्यांना आवडायचे. ही दोन गाणी बघा. १९५७ साली ‘बारीश’ ह्या चित्रपटासाठी लिहलेले रोमँटिक गाणे लतादिदी आणि सी. रामचंद्रने गायलेले 'फिर वही चांद, वही हम, वही तनहाई है' (https://youtu.be/ayrJfNGoul0?t=30) ऐका आणि नंतर १९६४ साली ह्याच गाण्यातील काही शब्द फिरवून एक दर्दभरे गाणे तयार केले. तलत महमूद ने गायलेले 'फिर वही शाम, वही गम, वही तनहाई है' (https://youtu.be/aYHxWmLTtpg). त्याकाळातील जवळपास सर्व मोठ्या संगीतकारासाठी त्यांनी गाणी लिहलीत. तरी सी. रामचंद्र, मदन मोहन, रवी, चित्रगुप्त, आणि हेमंतदा ह्यांच्या सोबत त्यांनी अनेक चित्रपट केलीत. सी. रामचंद्र, आणि मदन मोहन ह्यांचे गाणे लागले तर बहुतेकदा ते गाणे राजेंद्र कृष्णचे असू शकते असे समजावे.

सी. रामचंद्र आणि राजेंद्र कृष्ण ह्यांनी सलग अनेक चित्रपट केलीत. ह्यांच्यासाठी लिहलेली काही गाणी म्हणजे लतादिदीने गायलेले 'ये जिंदगी उसीकी है' (https://youtu.be/1eFso_5-bFc), 'राधा ना बोले ना बोले रे' (https://youtu.be/bMd_Ab7U8VU) आणि अशी बरीच सुंदर गाणी त्यांनी लिहिलीत. ह्यांची जोडी सी. रामचंद्र ह्यांच्या चढतीच्या काळात खुप हिट झाली. ह्या दोघांची 'अलबेला' (१९५१) आणि 'अनारकली' (१९५३) ह्या चित्रपटांची गाणी अवश्य ऐका. पुढे मानबिंदु ठरलेला 'मुघल ए आझम' हा 'अनारकली' ची प्रेरणा घेऊनच केला गेला.

मदन मोहन आणि राजेंद्र कृष्ण ह्यांची घट्ट मैत्री जगजाहीर होती. दोघांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. लतादिदीने गायलेले 'हम प्यार में जलने वालो को' (https://youtu.be/IXQY5otyhJ8), 'वो भुली दास्तान' (https://youtu.be/vwVqOiR193o), 'यु हसरतो के दाग' (https://youtu.be/i0XYKC2YQ9w), आणि 'मै तो तुम संग, नैन मिला के हार गयी सजना' (https://youtu.be/XQonGT4CbUo). 'देख कबीरा रोया' ह्या संगीतप्रधान चित्रपटाची सर्वच गाणी उत्तम आहेत. 'अदालत' आणि अजून एक संगीतप्रधान चित्रपट 'जहान आरा' ह्या चित्रपटाची सर्व गाणी अवश्य ऐका.

संगीतकार रवी ह्यांनी पण राजेंद्र कृष्ण सोबत अनेक सुंदर गाणी केली आहेत.  रफींनी गायलेले आणि गुरुदत्तवर चित्रित 'इस भरी दुनिया में कोई भी हमारा ना हूआ' (https://youtu.be/up4Gkxb66ac), लतादिदी आणि महेंद्र कपूर ह्यांचे 'आज की मुलाकात बस इतनी' (https://youtu.be/oYCxua2S0HY), आशाताई ह्यांनी गायलेले 'ये रास्ते है प्यार के चलाना समल के' (https://youtu.be/oPf3ffpXdGk).

सलिलदांचे तलत महमूदने गायलेलेआँसू समझ के क्यों मुझे' (https://youtu.be/_w8KSpiLm14). ‘छाया’ ह्या चित्रपटाची सर्वच गाणी जरुर ऐका. राजेंद्र कृष्णने RD बरोबर पण काही चित्रपट केलीत. त्यात ‘पडोसन’ आधी घ्यावे लागेल. त्यातली सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. पण जरा हटकेच गाणे इथे देत आहे. किशोर कुमार ने गायलेले 'मेरी प्यारी बिंदू' (https://youtu.be/Zr_enRRcyuw). बऱ्याचदा ऐकले असेल. मी म्हणतो म्हणुन अजुन एकदा कान देऊन ऐका. राजेंद्र कृष्णने हेमंतदा सोबत पण खूप चित्रपट केलीत. त्यात विशेष म्हणजे १९५४ चा 'नागीण'. ह्या चित्रपटातील सर्वच गाणी हिट होती आणि आज पण आहेत. लक्ष्मीकांत-प्यारेलाल सोबत पण काही चित्रपट त्यांनी केली. त्यातले एक गाणे सांगतो किशोर कुमार आणि लतादिदीने गायलेले 'जादूगर तेरे नैना’ (https://youtu.be/AxG_a8l0AJQ).

इथे दिलेली गाणी आणि काही चित्रपटाची नावे दिलीत त्यातली गाणी ही संपुर्ण जर ऐकली तर एक आठवडा पुरेल इतकी करमणुक आहे. इथे जितकी गाणी दिलीत त्यापेक्षा त्यांची अधिक गाणी लोकप्रिय आहेत. पण blog ची लांबी बघत इथे काहीच दिलीत. अत्यंत श्रीमंत असे राजेंद्र कृष्ण वैयक्तिक जीवनात पण मनमौजी होते. लोक म्हणायचे की ते जर studio मध्ये नसतील तर रेसकोर्स वर असतील म्हणजे काय तर त्यांचे सारे जीवन "मुझे चैन से रहने दो' गात गेले! 


सतीश गुंडावार

१-ऑगस्ट-२०२० 


    13 comments:

    1. अप्रतिम एका पेक्षा एक सरस गीते...
      डॉ आनंद फाटक

      ReplyDelete
    2. मस्तच👌👌👌

      ReplyDelete
    3. सगळी उत्तमोत्तम गाणी निवडकीस!

      ReplyDelete
    4. मस्त गुंडावर साहेब

      ReplyDelete
    5. छान लिहिलंय

      ReplyDelete
    6. Very nice information and lots of old songs which is evergreen...

      ReplyDelete
    7. This comment has been removed by the author.

      ReplyDelete
    8. Selection of songs is awesome, the information is interesting..enjoyed reading it.

      ReplyDelete
    9. Sakol abhyas karun lihile ahe. Phar chan information dile ahes..

      ReplyDelete
    10. Highly informative ...great writing ...keep it up Bapu!

      ReplyDelete
    11. अप्रतिम शब्दसंग्रह आणि सुरेख मांडणी.
      This blog really added knowledge.

      Thanks,
      SheetalKumar Dasarwar

      ReplyDelete