Tuesday, 13 April 2021

संपूर्ण सिंग कालरा

नाव जरा ऐकले वाटत नाही ना? १९६३ पासून (~ ६० वर्षे) हिंदी चित्रपट सृष्टीत सतत काम करणारे ज्यांना आत्तापर्यंत २२ फिल्म फेअर, नॅशनल अवॉर्ड, ग्रॅमी, ऑस्कर आणि सर्वात मानाचा दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालेले असे. १३३ चित्रपटांना गीत, ६९ चित्रपट कथा, १७ चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे. अगदी classical गाण्यांपासुन, अंगाई गीत, आधुनिक item songs पासून तर ते जय हो सारख्या आंतरराष्ट्रीय गीतापर्यंत गीत लिहिणारे. काहींनी आत्तापर्यंत ओळखले असेलच. चित्रपट सृष्टीत उत्युन्ग कामगिरी आणि त्याच प्रमाणे चित्रपट सृष्टीच्या बाहेर पण तेवढीच मोठे काम करणारे सर्वांचे आवडतेगुलझार’. गुलझार ह्यांना दोन पानात बसवणे म्हणजे सूर्याला काजवे दाखवणे म्हणावे लागेल. भारतीय संगीतावर आधारित, ज्यात गायकीवर, काव्यावर भर, गाण्यात प्रेम, श्रुंगार, दर्द, विरह, व्यथा समर्पक रीतीने मांडणारे गुलझार स्त्री मनाच्या अंतरंगाचे वर्णन एखाद्या स्त्रीला लाजवेल असे केले आहे. त्यांनी मदन मोहन, एस. डी. बर्मन, जयदेव, आणि आधुनिक संगीतकारापैकी विशाल भारद्वाज अश्या अनेक संगीतकारांसोबत काम केले. पण त्यांचे पंचम म्हणजेच आर. डी. बर्मन सोबत केलेले काम काही विशेष आहे. हिंदी चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळापासून आजही काम करणारे फार कमी लोक आता उरले आहे. त्यात गुलझार अग्रेसर आहेत.   

गुलझार ह्यांचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या हजार पैलू पैकी एक पैलूवर जर लिहले तरी मोठा लेख होईल. त्यांच्या हजारो गाण्यातून काही निवडक गाणे काढणे म्हणजे त्यांच्या उरलेल्या गाण्यांवर अन्याय करणे होय. गुलझार ह्यांनी शब्द रचना आणि शब्दाचा खेळ अत्यंत अलंकारिक पद्धतीने केला आहे. जे शब्द त्या ठिकाणी सामान्य रसिक कल्पना करू शकत नाही किंवा दोन शब्द एकत्र कसे येऊ शकतात पण गुलझारने नेमके तेच केले. स्त्री मनाची गुंतागुंत गुलझारने बाकीच्या गीतकारांपेक्षा वेगळ्या पद्धतीने केली. नवऱ्याच्या दुसऱ्या स्त्री बरोबर झालेल्या मुलाकडे बघताना तीचे मन काय म्हणेल? 'मुस्कुराये तो मुस्कुरानेके कर्ज उतारने होंगे' पुढे ह्या गाण्यात ती म्हणते 'जैसे होटोंपे कर्ज रखा हैं'. (https://youtu.be/b04C6hKGLXA). त्याच गाण्याचा उपयोग त्या नवऱ्यासाठी पण गुलझारने केला आहे. जो भावनेच्या भरात त्याची निशाणी मागे ठेवून गेला. पण ती निशाणी अचानक डोळ्यासमोर आल्यावर त्याची भावना काय असेल? पत्नीची आणि नवऱ्याची एकाच घटनेची विभिन्न भावना एकाच गाण्यात दाखवण्याची करामत गुलझारनेच करावी. पती-पत्नीचे एकमेकांवर अत्यंत प्रेम पण परिस्थितीने दूर गेलेले जोडपे समोरासमोर आल्यावर काय संवाद करतील? 'कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राहे', पण मला तुझ्याजवळ यायचे आहे तर ती म्हणते. ‘इन रेशमी राहो में इक राह तो वो होगी जो तुम तक पहुचती हैं’ (https://youtu.be/STOM6NZfcrs). त्यावर तिचा पती म्हणतो. 'तुम जो कह दो तो आज की रात चाँद डुबेगा नही .... रात को रोक लो' (https://youtu.be/8-HnmVg0-O8). एकीकडे विभक्त जोडप्यांची व्यथा तर दुसरीकडे एकमेकांच्या अत्यंत प्रेमात पडलेल्या पती-पत्नीची भावना. 'बोलो देखा हैं कभी तुमने मुझे उडते हुये', पुढे त्याच गाण्यात ती म्हणते ‘लगी आंखो को देखा हैं कभी उडते हुये' (https://youtu.be/MqCzyGLxQeQ). त्याच चित्रपटात अजून अशीच भावना व्यक्त करणारे गाणे आहे. 'आपसे भी खुबसुरत आपके अंदाज हैं' पुढे त्याच गाण्यात ‘आपकी खामोशिया भी आपकी आवाज हैं' (https://youtu.be/NbqCWwlNKrA).

विरहातली स्त्री असेच काही तरी विचार करत असेल. 'टूटी हुयी चुडीयोंसे जोडू ये कलाई' ह्याच गाण्यात पुढे ती म्हणते 'पैरो में ना साया कोई सर पे सायी रे' (https://youtu.be/zgC3-E36bwg). प्रियकराच्या प्रेमात पडलेली प्रेयसीच्या भावना गुलझारने नेमक्या शब्दात मांडल्या आहेत. 'जीना भुले थे कहा याद नही' पुढे ह्याच गाण्यात 'वक्त से कहना जरा वो ठेहेर जाये वही' (https://youtu.be/MQJYSZ2izIM) अश्या भावना गुंफल्या आहेत. कानू रॉय ह्या प्रतिभावान संगीतकाराने गीता दत्त ह्यांच्या कडून गावुन घेतलेल्या ह्या गाण्यात प्रेयसीची भावना, 'दो बुंदे ना बरसे इन भीगी पलको', पुढे त्याच गाण्यात 'दो जुडवा होटो की बात कहो आंखो से' (https://youtu.be/F6FkVPOMtvM) अश्या शब्दात गुंफली आहे. इजाजत मधील ह्या गाण्यात 'बारिशो की पानी से सारी वादी भर गयी' पुढे त्याच गाण्यात नायिकेच्या व्यथा 'बुंदो में पानी था पानी में आसू थे' (https://youtu.be/3wmmqnoW_us) अश्या शब्दात लिहिल्या आहेत.

गुलझारने पुरुष मनाच्या भावना, व्यथा, प्रेम तितक्याच अलंकारिक पद्धतीने मांडल्या आहेत. एक ड्राइवरच्या रस्त्याबद्दल नेमक्या काय भावना असतील? 'उडते पैरो के तले जब बहती हैं जमी', पुढे ह्याच गाण्यात 'मुडके हमने कोई मंजिल देखी ही नही', आणि जेव्हा इथे विसावा घ्यावा असे वाटले तर 'बस्तियो तक आते आते रस्ते मुड गये' (https://youtu.be/CpYuH4Cc8Mk). एका प्रियकराची व्यथा 'एक बार यु मिली मासुम सी कली', पुढे त्याच गाण्यात 'एक बार वक्त से लम्हा गिरा कही' (https://youtu.be/xobeTscjOM0?t=10) अश्या शब्दात गुंफली आहे. अजून एका गाण्यात ‘दिन खाली खाली बर्तन और रात हैं जैसे अंधा कुवा', गुलझारचा प्रियकर रडतो पण तो म्हणतो 'आसू की जगह आता हें धुआ' (https://youtu.be/EpbjO-Qdfuc). हृदय तुटलेल्या प्रियकराचे मनोगत ह्या गाण्यात ठासून भरलेले आहे. 'पानीयो में बह रह हैं कई किनारे टूटे हुए' (https://youtu.be/vHGHzYFzr-E?t=7). प्रेयसीची आतुरतेने वाट बघणारा प्रियकर आपली भावना कशी मांडेल? 'सांस लेते हैं जिस तरह साये', पुढे त्याच गाण्यात 'जैसे खुशबु नज़र सें छू जाए', पुढे त्याच गाण्यात 'वक्त जाता सुनाई देता हैं' (https://youtu.be/VfaqM5wfCY0) अश्या शब्दात ती भावना गुंफली आहे.

गुलझारवर प्रेम करणारा एक वेगळाच रसिक वर्ग आहे. तो अशी असंख्य गाणी सांगू शकतो. गुलझार सारख्या हिमालयाच्या आकाराच्या कवीला दोन पानात सामावण्याचा गुन्हा मी केला आहे. पण तो प्रेमाने स्वीकारावा.

 

सतीश गुंडावार

१३ एप्रिल २०२१ 

6 comments:

  1. सुंदर लिहिले

    ReplyDelete
  2. अप्रतिम..गुलजार हा विषयच अथांग आहे..
    डॉ.आनंद फाटक..

    ReplyDelete
  3. खुप छान व माहिती पूर्ण ..

    ReplyDelete
  4. जोरदार गुंडावार साहेब नेहमी प्रमाने

    ReplyDelete
  5. फारच छान.... सर्व गाणी apt and awesome articulation ....

    ReplyDelete