मागच्या लेखात लिहल्यानुसार,
आज हेमंतदांच्या गायकीवर
लिहणार आहे. मागच्या लेखात सांगितल्याप्रमाणे
सलिलदा म्हणत की
देवांचा आवाज हा हेमंतदां सारखा असणार.
हेमंतदांचा आवाज अगदी
वेगळा, धीरगंभीर, प्रामाणिक
आणि सात्विक होता.
स्वतः उत्कृष्ट संगीतकार
असूनही त्या काळातील
सर्व नावाजलेल्या संगीतकारांनी
हेमंतदा कडून खूप
चांगली गाणी गावुन
घेतली आहे. माझे
सर्वात आवडते त्यांचे गाणे
म्हणजे हेमंतदा निर्मित
आणि संगीत दिलेला
'कोहरा'
ह्या रहस्यमय चित्रपटातील 'ये नयन
डरे
डरे'.
https://youtu.be/2gMhbWeo30o हे अगदी
सूक्ष्म गाणे प्रत्येक
ओळीत ३ ते ४ शब्द
आणि ६ ते ८ अक्षरे
आहेत. पण हेमंतदांच्या
गायकीने हे गाणे भव्य केले.
हेमंतदांचे गाणे म्हटले
की कमीतकमी वाद्यात
गायकीला प्राधान्य देत
गाणे केले आहे.
गाण्याचे पार्श्वसंगीत अत्यंत साधे
आणि सरळ आहे.
गाण्याचे शब्द, हेमंतदांची
गायकी आणि वहिदा
रहमानच्या अभिनयाने ह्या कृष्णधवल गाण्यात
असंख्य रंगाची उधळण केली आहे. ह्या गाण्यात
वहिदा रहमान ह्यांच्या
चेहऱ्यावरील हावभाव फारच
स्वच्छंद आहेत. असा romantic अभिनय हल्ली कोणी करणे म्हणजे अशक्यच.
कित्येकजण म्हणतात की हेमंतदा
आठवले की सर्वात
पहिले हे गाणे आठवते. गेले
काही दिवस मी हे
गाणे रोज ऐकत आहे. गाण्याचा
hangover दुसऱ्या दिवसापर्यंत राहतो!
हेमंतदांचा आवाज गंभीर
असला तरी त्यांनी
श्रुंगाररसातील प्रेम गीते
खूप गायली आहेत.
‘बीस साल
बाद’
ह्या हेमंतदा निर्मित
आणि संगीत दिलेल्या चित्रपटातील 'बेकरार
करके हमें यु ना जायीये' https://youtu.be/xpIJQri622A
गाण्याला हेमंतदांचा स्पर्श आणि कोणतेही प्रचलित तालवाद्य गाण्यात नाही. गिटारच्या
दोन बीटवर संपुर्ण गाणे रचले आहे. Interlude मध्ये Accordion चा छोटासा तुकडा गाण्याला
रंजक करते. अजून एकदा विश्वजीत आणि वहिदा रहमान ह्यांच्या जोडीने प्रेमीयुगलांचे सुंदर
भाव ह्या गाण्यात दिले आहेत. सचिनदाने तयार केलेले 'ना तुम हमें जानो ना हम तुमे जाने' https://youtu.be/LFa9nAq68Wk देव आनंद आणि
पुन्हा एकदा वहिदा रहमान ह्यांच्या अभिनयात प्रेमीयुगलांची आतुरता आणि आकर्षण ह्यांचे
समर्पक चित्रीकरण ह्या गाण्यात आहे. शंकर
जयकिशनने तयार केलेले 'याद किया दिल ने कहा
हो तुम' https://youtu.be/PvwnvoUOa-Q
हे गाणे ऐकले की हेमंतदांचे संगीत वाटेल असे साधे आणि सरळ संगीत ह्या गाण्याला आहे.
देव आनंद आणि उषा किरण ह्यांनी प्रेमीयुगलांचा स्वच्छंदपणा दोघात अंतर ठेवून दाखवले
आहे. नायक नायिकेचे असा romantic अभिनय हल्ली दुर्मिळच.
विरह गीतांसाठी हेमंतदांचा
आवाज तर स्वाभाविक वाटतो. त्यांनी असंख्य विरह गीत गायली आहेत. 'अनुपमा' ह्या हेमंतदांनी संगीत दिलेल्या
चित्रपटातील 'या दिल की सुनो दुनियावालो'
हे गाणे धर्मेंद्रवर चित्रित केलेलं आहे. https://youtu.be/poXBa76JNKk
धर्मेंद्र कोणतीही हालचाल न करत एकाच जागेवर उभे राहून आपल्या मनातील भावना व्यक्त
करतो. गाण्याला कोणतेही प्रचलित तालवाद्य नाही. गिटारच्या एका बीटवर संपूर्ण गाणे रचले
आहे अशी किमया हेमंतदांनी केली आहे. गुरुदत्त ह्यांच्या 'प्यासा' ह्या चित्रपटातील सचिनदांनी संगीत दिलेल्या 'जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला'.
गाण्याला हेमंतदांनी संगीत दिले असेल असा भास होतो. हेमंतदा निर्मित आणि संगीत दिलेल्या
'खामोशी' ह्या चित्रपटातील 'तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है’ https://youtu.be/Oo3bE64YJig. ह्या गाण्यात
वहिदा रेहमानच्या द्विधा मनःस्थितीचे रेखाटन फारच मार्मिक आहे. हे अजून एक गीत आहे
की प्रेक्षक हेमंतदा म्हटले की हे गाणे सांगतात. सी. रामचंद्र ह्यांनी संगीत दिलेल्या 'अनारकली' ह्या चित्रपटातील 'जाग
दर्द ए इश्क जाग’ ह्या गाण्याची सर्व मूल्ये उच्च दर्जाची आहेत.
शास्त्रीय संगीतावर आधारित
काही उत्कृष्ट गाणी हेमंतदांनी दिली आहेत. कित्येक गाण्यात प्रचलित तालवाद्य न वापरणारे
हेमंतदा ह्यांनी 'चली गोरी पी से मिलन को चली'
https://youtu.be/eJzaXWfmu0A ह्या गाण्यात
तबला वापरला आहे. ह्या गाण्यावर मीनाकुमारीने सुंदर कथ्थक नृत्य केले आहे. मीनाकुमारीचे
नृत्य बघायला आणि हेमंतदांची गायकी ऐकायला हे गाणे दोनदा बघाल अशी मला खात्री आहे.
आणि वसंत देसाईंनी केलेले 'नैन सो नैन नाही
मिलाओ' https://youtu.be/L6kNKzN3zPo
हे गाणे. ह्या संथ गाण्यात एक विलक्षण
ठेहराव आहे आणि त्यात संध्या आणि गोपीकृष्ण ह्यांचा संथ नृत्य फारच आकर्षक आहे.
हेमंतदांची उडत्या चालीवरची
तशी गाणी कमीच पण सचिनदांनी केलेले 'हे अपना
दिल तो आवारा' हे गाणे सर्वांच्या ओठावर आहे. हेमंतदांची इतर लोकप्रिय गाणी, 'शर्त' ह्या चित्रपटातील हेमंतदांनी केलेले
'न ये चांद होगा ना तारे रहेंगे'. सचिनदांनी
केलेले 'ये रात ये चांदनी फिर कहा सून जा दिलकी
दास्तां' आणि बरीच अशी सुंदर गाणी.
हेमंतदांचा सुवर्णकाळ
५० ते ७० च्या दशकातला. ह्या लेखातील गाणी ५५ ते ७० वर्षे जुनी आहेत पण आजही चोखंदळ
रसिकांच्या हृदयात अजूनही जागा करून आहेत. बहुतांश गाणी कृष्णधवल पण रंगाची कमतरता
कुठेही भासत नाही. ही सर्व गाणी आजच्या पिढीच्या जन्माच्या आधीची किंवा त्यांच्या अगदी
बालपणीची आहेत. इतकी वर्षे गाणी लोकप्रिय राहणे हे त्यांच्या उच्च गायकीची आणि संगीतकाराची
प्रचिती देते.
सतीश गुंडावार
२५ एप्रिल २०२०
मस्त गुंडावर साहेब
ReplyDeleteLink दिल्यामुळे अजून मजा अली
व्वा! Link मुळे ताबडतोब आनंद अनुभवता आला. Theory and practical.
ReplyDeleteWell composed dear...keep writing
ReplyDeleteVery well express and due to link everyone feel, two decades of melodious song's.
ReplyDeleteTerrific continue writing...
ReplyDeleteफार अभ्यासपूर्ण लिहिलं आहेस !
ReplyDeleteगीतांची निवड समर्पक!
हेमंत दा यांच्या महान सांगीतिक कारकिर्दीची यथायोग्य मीमांसा !
सुंदर !
Thanks to everyone
ReplyDeleteछान माहिती, हेमंत दा ऐकून माहीत होते, गाण्यांतून केलेल्या परीक्षणामुळे अजून उलगडले...
ReplyDeleteवाह ! फारच सुंदर मांडलंय 🙂🙏.
ReplyDeleteहेमंत दा हे रसायन वेगळंच होतं. त्यांची बांग्ला गाणी देखील अप्रतिम आहेत. सेहगल साहेबांपासून प्रेरित झालेल्या गवय्यांपैकी ते एक ज्यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला. आवाज , expression , गाण्यातील हरकती ह्या सगळ्यात हेमंत दांचं वेगळेपण लक्षातच येतं. त्यांनी आणि लता दीदींनी गायलेलं ' छुपालो यु दिल मे प्यार मेरा ' हे गाणं आवर्जून आठवतं.
तुम्ही कधीतरी तलत वर ही लिहावं ही विनंती 🙂🙏