Friday 31 December 2021

पवारांच्या लिला

सत्तेपासून पैसा आणि पैश्यातून सत्ता ह्या तंत्रात तरबेज असलेल्या पवारांनी कोणतेही बहुमत नसतांना काॅंग्रेस सोबत १५ वर्षे आणि सर्व त्यांच्या योजनेसारखे चालले तर ही ५ वर्षे सत्तेत रहाण्यात यशस्वी होतील.

२०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपला न मागता पाठिंबा द्यायची तयारी दाखवून शिवसेनेला कात्रीत अडकवले. ह्या सर्व प्रकरणात शिवसेना ५ वर्षे सलत सत्तेत राहले जे पवारांच्या फायद्याचे ठरले. २०१९ च्या निवडणुकीनंतर अजून भाजपा आणि शिवसेनेला आपल्या तालावर नाचवत पहिले भाजपाला तोंडावर पाडले. अजीत पवारांनी शपथविधी पवारांच्या सहमती विना केली असेल हे मानण्यात मराठी माणूस खुळा नाही. पवारांना नक्की माहिती होते की भाजपा बरोबर सत्तेत राहले तर दुय्यम भुमिकेत राहावे लागेल. सत्तेतून पैसा मिळण्याची संधी तर नाहीच नाही. पण शिवसेने सोबत सत्तेत राहले तर सत्तेचे सुत्र आणि सुकाणु हे दोन्ही त्यांच्या हातात. पवारांच्या लिलेत भाजपा आणि शिवसेने मस्त फसली आणि सत्ता आपल्या ताब्यात घेतली ती पण तीन नंबरचा पक्ष असतांना!

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नवीन लिला दाखवली. मोदी आणि शहा त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही हे त्यांना नक्की माहिती आहे. पण शिवसेनेला संदेश देत आहे की भाजपासोबत आम्ही कधीही जावू शकतो. गेल्या दोन वर्षांत त्यांनी अशा काही गोष्टी शिवसेनेकडून करून घेतल्या जसे अर्नबला अटक, कंगनाचा बंगला तोडणे, राणेंना अटक की शिवसेना आणि भाजप ह्यांची भविष्यात कधीही युती होणार नाही. 

ह्या लिलेतील नुकताच घटना म्हणजे विधानसभा अध्यक्ष निवडणूक. पवार आणि ठाकरे दोघांनाही ते पद कॉंग्रेसला द्यायचेच नाही. त्यात कॉंग्रेसमध्ये ह्या पदासाठी कोण ह्यात सहमत नाही. मग खापर कोणावर फोडायचे. ते राज्यपालांवर फोडले. इतका वर्षांचा प्रशासकीय अनुभव असतांना असे नियम राज्यपाल संमत करणार नाही हे समजण्याइतके तज्ञ ते नक्कीच आहे. ह्या खेळीतर कॉंग्रेस आणि शिवसेना दोघांनाही चितपट केले. ठाकरेंना राज्यपालांना ठाकरी भाषेत पत्र लिहायला लावले.  शिवसेना आणि राज्यपाल आणि पर्यायाने भाजपाचे संबंध अजून खराब केलेत तर कॉंग्रेस पदाविना हात चोळत बसला. येत्या वित्त अधिवेशनात ते पद कॉंग्रेसला मिळवायचे असल्यास निवडणूक हा एकच मार्ग आहे. पण निवडणूक हे सरकार पडण्यास कारणीभूत होऊ शकते हे पवारांना नक्की कळते. पवारांची पुढील लिला काय असेल ते पुढे बघूच पण सध्या तरी ते भाजपा, शिवसेना आणि कॉंग्रेस ह्यांना आपल्या तालावर नाचवण्यात ते यशस्वी होत आहेत.

सतीश गुंडावार
१ जाने २०२२

Thursday 30 December 2021

आगे भी जाने ना तू

https://youtu.be/Cm2MqoCvTw8

हे १९६५ चे गाणे म्हणजे अर्धे शतक जुने! संगीतकार रवी ह्यांच्या प्रकृतीच्या अगदीच भिन्न. हे गाणे पण तसेच म्हणजे गाण्याचे कोणते अंग बघायचे?

Prelude ची सुरवात trumpet आणि rhythm guitar ने केली आहे. २० सेकंदानी rhythm guitar आणि lead guitar ची मेलोडी. त्यानंतर येतो आशाताईंचा रेशमी आवाज जो गाण्याचा प्राण आहे.

गाण्यात लांब लांब तीन interludes आहेत. तिन्ही interludes एकमेकांपासून पुर्णपणे भिन्न. पहील्या interlude ची सुरुवात violine च्या दोन group ची counter melody ने सोबत lead guitar आणि mandolin ने शेवट. दुसरे interlude तब्बल ५५ सेकंदांचे! हे interlude गाण्याचे धृवपदच आहे. सुरुवात सुंदर saxophone ने नंतर mandolin आणि accordion ची जुगलबंदी आणि नंतर violine ने शेवट. तिसरे interlude saxophone, mandolin आणि गायिकेच्या आवाजाचे मिश्रण.

तब्बल ८ मिनिटाचे गाणे string section, brass section आणि wind section पुरेपूर. गाण्यात कोणतेही ताल वाद्य नाही. Rhythm साठी फक्त rhythm guitar चा उपयोग. 

गाणे राग पहाडीवर आधारित आहे म्हणतात जे ह्या कानसेनाला कळण्याइतके ज्ञान नाही. पण western orchestration वर भारतीय गाणे म्हणजे fusion चे उत्तम उदाहरण. 

आणि आता ४० वर्षांनंतरचे हे गाणे ऐका आणि सांगा.

https://youtu.be/-6Y8hMyEoV8

😁😁😁

Tuesday 14 December 2021

दिल की नजर से नजरों के दिलसे

बऱ्याच दिवसांपासून एखाद्या गाण्यावर लिहावे असे वाटत होते.  पण शोधून अश्या गोष्टी मिळत नसतात त्या समोर येतात. आज सकाळी रेडिओ लावला आणि हे गाणं लागले.

गाण्याचे संगीत पाश्चात्य असले तरी भारतीय सरळ चालीवरचे fusion. गाण्याचे मुख्य वाद्य अकाॅर्डियन सोबत मेंडोलिन, व्हायोलीन, ड्रम आणि डबल बास एवढीच वाद्ये. Prelude व्हायोलीन आणि अकाॅर्डियनच्या सुंदर counter melody ची आहे. ती ऐकताच गाणं ओठांवर येते. गाण्यात ड्रम आणि डबल बासचे साधे rhythm सतत वाजत आहे. Interlude मध्ये व्हायोलीन आणि अकाॅर्डियनची अप्रतिम गुंफन. अश्या ह्या पाश्चात्य पार्श्वसंगीतावर  लतादीदी आणि मुकेशचा तलम आवाज. छायाचित्रण कृष्णधवल असले तरी पडदा राजकपूरचे राजबिंडा रुप तर नूतनच्या सोज्वळ सौंदर्याने व्यापून टाकले आहे. 

शंकर जयकिशनने संगीतबद्ध केलेले. सुमीत मित्रांची जादुई बोट अकाॅर्डियन पडली आहेत. शैलेंद्रची अद्भूत रचना *दिल की नजर से नजरों के दिलसे* असे सर्वांग सुंदर गाणं. आज राजकपूर ह्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने जरूर ऐका आणि आनंद घ्या.

सतीश गुंडावार
१४ डिसेंबर २०२१
🙏🏻🙏🏻🙏🏻
https://youtu.be/t8vDu-C7u1Q