Friday 1 October 2021

जा रे जा रे उड जा रे पंछी

https://youtu.be/YTMxRVtgLy4

ह्या गाण्याच्या कोणत्या अंगाकडे लक्ष द्यायचे हा मोठा प्रश्न आहे😁😁😁

६० वर्ष जुने गाणे आहे. चार मिनिटाच्या गाण्यात ४८ सेकंदाचा prelude जो पुर्ण पाश्चात्य आहे. Symphony style चे. संपूर्ण गाण्यात भारतीय ताल. हिंदुस्थानी गायकीच्या मागे opera style चे violine. Melody आणि counter melody चा उत्तम वापर. Interlude मध्ये saxophone नक्कीच मनोहरीदांचा असणार 👌🏻👌🏻👌🏻एकच तक्रार...interlude परत परत तेच वापरले 😭

कृष्णधवल चित्रीकरण असले तरी दोघांमधील दुरावा प्रभावी उतरवला आहे. त्यात माला सिन्हा आणि देवानंदचा मार्मिक अभिनय..

गाण्याचा भाव आणि त्यावर लतादीदींचा सोनेरी आवाज. माझ्या पिढीपर्यंत तर हे गाणे जीवंत आहे. पुढची पिढी पण हेच ऐकणार हे निश्चित.

सलिलदा आणि लतादीदींचे अनंत उपकार गेल्या अनेक पिढ्यांवर आहेत 🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment