Friday, 17 June 2022

जिंदगी ख्वाब है!

दिवसाची सुरवात जर हृदयातील गाण्याने झाली तर ते गाणे दिवसभर ओठांवर असते. आज असेच काही तरी झाले. आज सकाळी हे गाणे विविधभारतीवर लागले.  सलिलदाचे गाणे असल्याने पाश्चात्य संगीताचा वापर आलाच. ह्या गाण्यातील muted trumpet ने माझे लक्ष वेधून घेतले आणि कायमचे हृदयातील गाणे झाले. खरेतर muted trumpet  वादक सरावासाठी वापरतात पण बऱ्याच संगीतकारांनी muted trumpet गाण्यात  खूप  नाविन्यपूर्ण वापरले आहे. गाण्यात Accordion आणि muted trumpet ची melody सुंदर आहे. muted trumpet असल्याने तो ChicChocolate ने वाजवलाअसावा असा माझा कयास आहे. गूगल बाबा त्यावर काही सांगत नाही. पण माझी खात्री आहे की १९५६ चा चित्रपट असल्याने Chic Chocolate नीच वाजवला असावा. पण ह्यावर कोणी खात्रीने सांगू शकत नाही ही खंत आहे. 

सलिलदांनी राजकपूर साठी क्वचितच गाणे केले आहे. त्यामुळे हे गाणे विशेष मानायला पाहिजे. सलिलदा,  शैलेंद्र आणि मुकेश ह्याचे साधे आणि सरळ गाणे असले तरी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून जाते. पडद्यावर राजकपूर आणि मोतीलाल हे त्यावेळचे superstar आहेत.

गाणे साधे असल्याने शौकीन गायकांसाठी मित्रांच्या मैफलीत गाण्यासारखे गाणे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तर हे गाणे अलीकडे पंकज कपूरने Happi ह्या चित्रपटात गायले आहे. जर पंकज कपूर गाऊ शकतो तर आपण तर नक्कीच गाऊ शकतो 😊 😊 पंकज कपूरचे हे गाणे इलायाराजा संगीतबद्ध केले आहे.

दोन्ही गाणी ऎका आणि संगीताचा आनंद घ्या!  

https://youtu.be/GQZaG5SZRYk

https://youtu.be/2ZU684l2sCs 

सतीश गुंडावार

१७-जून-२०२२