Monday 26 September 2016

विषवल्ली जातीभेदाची


कोण म्हणे ते होते मुक मोर्चे 
मी तर ऐकले कण्हणे मातृभूचे
माँ म्हणे केव्हा नांदतील हे सौख्यभरे
रामा म्हणे जेव्हा भूक मिटे तुझी रक्ताची 

कोणी लावला रंग जातीचा खैरलांजीला
ह्यांनीच लावला ना वेमुलाला रंग जातीचा
कोणी लावला रंग धर्माचा अखलाकला
आता हेच लावतायत रंग कोपर्डीला जातीचा

आता हेच ठाकतायत एकमेका विरुद्ध जाती
आता हेच तोडतायत माझी नाजूक कांती
सांगू कसे लेकरांनो रिपू आला उंबरठ्यावर
खुप झाली परदास्याची रात बघूद्या जरा वैभवाची पहाट 

आता खूप झाला जातीद्वेष लेकरांनो
आणा समरसता समते बरोबर
रामा म्हणे बघतोय वाट परशुरामाची
तोच संपवेल विषवल्ली ही जातीभेदाची   

 
                 सतीश गुंडावार (२६-सप्टें-१६)